शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पालिकेच्या नियोजनाअभावी जालनेकरांवर जलसंकट..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:07 IST

रविवारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून जनतेचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला. हे उपोषण हुतात्मा जनार्दन मामा चौकामध्ये करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील पाणीटंचाई ही ज्यांच्या हातात पालिकेचे सूत्र आहेत त्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाली आहे. यापूर्वी पालिकेच्या झालेल्या सभांमधून आम्ही प्रशासन तसेच काँग्रेसच्या नेत्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील त्यासाठी आतापासूनच नियोजन करा, अशी मागणी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज जालनेकरांवर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद झाले आहे.रविवारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून जनतेचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला. हे उपोषण हुतात्मा जनार्दन मामा चौकामध्ये करण्यात आले. यावेळी जालना पालिकेचे उपाध्यक्ष तथा नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले राजेश राऊत, नगरसेवक भास्कर दानवे, अशोक पांगारकर, सतिश जाधव, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, नगरसेवक राठी, संध्या देठे, शशिकांत घुगे, चंपालाल भगत, गेंदालाल झुंगे, विशाल बनकर, शहराध्यक्ष सिद्धीविनायक मुळे आदींची यावेळी उपस्थिती होती.पत्रकारांशी बोलताना भास्कर दानवे म्हणाले की, खा. रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील पाणीटंचाईवर तातडीचा उपाय म्हणून ६१ टँकर सुरू करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या समवेत बैठक घेऊन ते सुरू करण्या संदर्भात सुचना केल्या होत्या. हे टँकर इंदेवाडी येथील जलकुंभातुन भरण्यात येणार आहे. यासाठी जास्तीचा वेळ खर्च होईल असा आरोप माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. मात्र, त्यात तथ्य नसून, आम्ही पाणी भरण्यासाठीचा जास्त क्षमतेच्या विद्युत मोटारींचा वापर टँकर भरण्यासाठी करणार आहोत. यासाठी केवळ एक ते दीड एमएलडी पाणी लागणार आहे. त्यातही हे पाणी अंबड येथून शुद्ध होऊन आल्याने ते थेट जालनेकरांना पिण्यासाठी वापरता येणार आहे. परंतु, यातही राजकारण आणण्याचा गोरंट्याल यांचा प्रयत्न चुकीचा असल्याचा आरोप दानवे यांनी केला.हे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण मागे घ्यावे म्हणून, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी उपोषणस्थळी भेट देवून आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.कामे अर्धवट असताना बिले अदा !यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत आणि अशोक पांगारकर यांनी सांगितले की, ज्या एजन्सीकडून अंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्याचे जवळपास ९६ कोटी रूपयांचे बिल कामे अर्धवट असतांना अदा केले आहेत. या मागे नेमका कुठला उद्देश आहे हा संशोधनाचा विषय होवू शकतो.जोपर्यंत काम समाधानकारक होत नाही, तोपर्यंत बील देऊ नये असे लेखी पत्र मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र त्या पत्राला केराची टोपली दाखवून कंत्राटदाराचे हित जपण्याचे प्रयत्न प्रशासन आणि पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदBJPभाजपाagitationआंदोलनWaterपाणी