धावत्या ट्रॅक्टरमधून तोल जाऊन पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 01:13 PM2020-02-05T13:13:51+5:302020-02-05T13:28:37+5:30

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना अपघात निदर्शनास आला

The driver died on the spot after falling off a moving tractor | धावत्या ट्रॅक्टरमधून तोल जाऊन पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू

धावत्या ट्रॅक्टरमधून तोल जाऊन पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू

Next
ठळक मुद्देचालक ट्रॅक्टरला उसने भरलेल्या दोन ट्रोली लावून अंबडच्या दिशेन निघाला होता

गोंदी (जालना) : धावत्या ट्रॅक्टरमधून तोल जाऊन खाली पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अंबड तालुक्यातील गोंदी- हसनापूर रस्त्यावर बुधवारी सकाळी उघडकीस आली. प्रदीप रामचंद्र नाहिराळे (वय- ३१, रा. अंकुशनगर येथील दिशनगरी) असे मयताचे नाव आहे.

प्रदीप नाहिराळे हे चालक असून बुधवारी पहाटे ते ट्रॅक्टरला ( क्र. एम. एच- २० एडी.- ४१६५)  उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन साडेगाव शिवारातून अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखान्यावर घेऊन चालले होते. हसनापूर फाट्याजवळ प्रदीपचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व तो खाली कोसळला. याचवेळी ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले व पुढे जाऊन ट्रॅक्टर उलटला. डोक्यावरून चाक गेल्याने प्रदीपचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना ही घटना निदर्शनास आली. त्यांनी गोंदी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.

Web Title: The driver died on the spot after falling off a moving tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.