शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

घाबरू नका, घाबरवू नका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:15 AM

जिल्ह्यातील शहरी आणि निमशहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली असून, चित्रपटगृह, मॉल इ. बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्याची गरज असून, सर्दी, अचानक आलेल्या तापाकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार आणि तपासणी करून घ्यावी. कोरोनाची भीती न बाळगता त्यापासून दूर कसे राहता येईल, यासाठी सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.प्रशासनही या संदर्भात आवश्यक ते सर्व खबरदारीचे उपाय करत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शहरी आणि निमशहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली असून, चित्रपटगृह, मॉल इ. बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.कोरोना विषाणूपासून होणाऱ्या संभाव्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात सोमवारपासून ३१ मार्च पर्यंत पालिका तसेच नगरपंचायत हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. तसेच कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी दर अर्धा ते एक तासाला सॅनिटायझर अथवा साध्या साबणाने हात धुणे गरजेचे आहे. शिंकताना तोंडाला रूमाल लावूनच शिंकावे, परस्परांमधील अंतर हे एक मीटरपेक्षा अधिक ठेवल्यास हा आजार जडण्याचे प्रमाण नगण्य होऊ शकते. हा आजार होईल अशा अफवा न पसरविण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेच्या सीईओ निमा अरोरा, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के.राठोड, आदींची उपस्थिती होती. सोशल मीडियावर अफवा पसरविणा-यांवरही कारवाई होणार आहे.खाजगी रूग्णालयाची मदत घेणारशासकीय पातळीवर जिल्हा रूग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेल्या अथवा संशयित रूग्णांवर तातडीने वैद्यकीय इलाज करण्यासाठी विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. तसेच जालन्यातील विविध खाजगी रूग्णालयांशी संपर्क करून तेथेही गरज पडल्यास काही बेड आरक्षित करण्यात आले आहेत. यासाठी आयएमएचे सहकार्य घेतले जात आहे. तसेच जालन्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही मुलांचे वसतिगृह ताब्यात घेतले असून, तेथे डॉक्टरांचे पथक आणि अन्य औषधींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व वैद्यकीय अधिका-यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.ग्रामीण भागात सर्वेक्षणशहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात कोरोनापासून ग्रामस्थांनी कसे दूर राहावे, यासाठी जागृती करण्यात येत आहे. तसेच आशा वर्कर, अंगणवाडी ताई आणि तलाठी, ग्रामसेवकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. खेड्यात जर कोणी आजारी असेल त्याची तातडीने माहिती जवळच्या आरोग्य केंद्रांना कळवून लगेचच त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.निर्देश : अनेकविध कार्यक्रम रद्दजिल्ह्यातील सर्व राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडाविषयक सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. या कार्यक्रमांना पूर्वपरवानगी असली तरी ते कार्यक्रम आता आपत्ती कायद्यानुसार रद्द करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकाºयांनी केली. गर्दी होईल, असे कुठलेच कार्यक्रम आयोजित न करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले आहेत.आठवडी बाजाराबाबतही लवकरच निर्णय होणार असून, खाजगी कोचिंग कल्लासेसही १५ ते ३१ मार्चपर्यंत सुटी देण्याच्या सूचना यावेळी कोचिंग क्लास चालकांच्या बैठकीत देण्यात आल्या. मंगल कार्यालयात होणाºया विविध वैवाहिक समारंभात जास्त गर्दी न करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.मास्क, सॅनिटायझरची कृत्रिम टंचाई करणाºयांवर कारवाईआज अनेक दुकानांमधून वेगवेगळ्या मास्क तसेच सॅनिटायझरची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु सॅनेटायझरची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे त्यांनी मान्य करून, अशी कृत्रिम टंचाई करणा-यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून अचानक छापे टाकून त्यांची तपासणी करण्यात येईल. तसेच चढ्या भावानेही याची विक्री रोखण्यासाठी आम्ही उपाय करणार असल्याचे ते म्हणाले.नागरिकांनी माहिती द्यावीअनेकजण परदेशात नोकरी तसेच शिक्षणासाठी गेलेले असतात. ते जालन्यात परतल्यावर त्यांना जर सर्दी तसेच तापाची लागण झाली असल्यास तातडीने त्याची माहिती वैद्यकीय विभागाला द्यावी, यासाठी पोलिसांची मदतही घेतली जात आहे. यासाठी नागरिकांनी देखील आपण परदेशातून आल्याची माहिती प्रशासनास कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाSchoolशाळाcollegeमहाविद्यालय