कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:31 AM2021-07-28T04:31:28+5:302021-07-28T04:31:28+5:30

जालना : कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. आता नव्याने व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यातच ऑनलाईन ...

Don't download the app as you get the message of loan at low percentage! | कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका !

कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका !

Next

जालना : कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. आता नव्याने व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यातच ऑनलाईन ठग सक्रिय झाले असून, कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सायबर चोरटे सक्रिय झाले आहेत. नामांकित कंपनी, वित्तीय संस्था, बॅंकाच्या नावाने बनावट वेबसाईट बनवून कर्जाचे आमिष दाखविले जात आहे. ऑनलाईन कर्ज घेण्यासाठी गुगलवर सर्च करणारी मंडळी अशा वेबसाईटच्या बळी पडतात. कर्ज मंजूर झाले असून, प्रोसेसिंग फी जमा करावी लागेल असे म्हणून प्रोसेसिंग फी च्या नावाखाली आपली फसवणूक केली जात आहे. सायबर चोरटे स्मार्ट फोन न वापरणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांचा संपर्क नंबर व्हॉट्सॲप मेसेज पाठवित आहेत.

केस १ : जालना शहरातील एका व्यक्तीच्या बॅंक खात्यातून कोणीतरी दोन वेळेस परस्पर पैसे काढून घेतले. त्यांनी दोन वेळा एटीएमसह पीन नंबरही बदलला. तसेच बॅंकेत विचारणा केली असता तुमच्याच एटीएम वरून पैसे काढल्याचे सांगितले.

केस २ : भोकरदन तालुक्यातील मुलीला लॉटरी लागल्याचे सांगितले. शासनाचा कर म्हणून अगोदर २० हजार रूपये भरावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार त्या मुलीने ८ हजार रूपये भरले. मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तीने नंबर बंद करून ठेवला.

सतर्क रहावे

कोणतीही बॅंक कर्ज देताना विविध कागदपत्रांची मानाई करते. सर्व कागदपत्रे देऊनही कर्ज मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे कर्जासंबंधी आलेल्या मेसेजची खात्री करावी. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

- मारूती खेडकर, सायबर सेल प्रमुख

या आमिषापासून सावधान !

n कोणत्याही कागदपत्रांशिवाय कर्ज मिळेल, असा मेसेज करून लिंक आली तर ती ओपन करू नये.

n कमी टक्के व्याजदारात कर्ज असा मेसेज आल्यास त्याची खातरजमा करावी. यात फसवणूक होण्याची शक्यता असेत.

n कुठल्याही गॅरंटी शिवाय प्रत्यक्ष भेटीगाठी न घेता कागदपत्र देऊ नये.

Web Title: Don't download the app as you get the message of loan at low percentage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.