शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

'रडू नको बाळा...तुला देते सोन्याचा गोळा'; वारीत गायलेली जालन्याच्या चिमुरडीची गवळण व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:56 IST

सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यादरम्यान, आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीही सहभागी झाल्या होत्या.

- राहुल वरशिळजालना : सध्या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यात विविध वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. हे विद्यार्थी कीर्तन, भजन आणि विठ्ठलाचा जयघोष करीत तल्लीन होताना दिसत आहेत. यातच आळंदी देवाची येथील राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेची इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणारी मूळ जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील हातडी येथील शिवानी रामदास शिंदे हिने "रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते आणि तुला लोण्याचा गोळा खायला देते" ही गवळण गायली. त्यानंतर या गवळणचा  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यादरम्यान, आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी संस्थाचालक हभप स्वरांजली हिंगे यांनी शिवानीला एक गवळण गाण्यास सांगितली. यावेळी रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे अंगात रेनकोट घालून कशाचीही तमा न करता भरपावसात शिवानीने "रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते आणि तुला लोण्याचा गोळा खायला देते" ही गवळण गायली. यावेळी दिंडीतील एका व्यक्तीने शिवानीचा व्हिडीओ काढून २३ जून रोजी सोशल मीडियावर अपलोड केला. सुमधुर आवाजातील या गवळणचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, दोन लाखांच्यावर नेटकऱ्यांनी तो पाहिला असून लाइक्, कमेंटकरून शिवानीचे सर्वजण कौतुक करत आहेत. 

ही तर माउलींचीच कृपा...सध्या राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेत एकूण १०० मुली शिक्षण घेत आहेत. सध्या आषाढी एकादशीनिमित्त आयोजित प्रदर्शनात शिवानीने गायलेली गवळण खूपच लोकप्रिय झाली. त्याचा मला खूप आनंद झाला आहे. ती एका वर्षापासून आमच्या संस्थेत शिक्षण घेत आहे. तिच्यामुळे आमच्या संस्थेचे नाव सर्वांना माहिती झाले आहे. ही माउलींची कृपा म्हणावी लागेल.- हभप स्वरांजली हिंगे, संस्थाचालक, राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची.*

वारकरी संप्रदायाचा वारसा कायम जपणारमाझ्या आजी-आजोबांपासून परमार्थाचा वारसा लाभलेला आहे. सध्या माझे वडील रामदास शिंदे दिंडीत सहभागी झाले आहेत. मी राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असून, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीत सहभागी झाले असून, हा आम्हाला लाभलेला वारकरी संप्रदायाचा वारसा कायम पुढे जपणार आहे.- शिवानी रामदास शिंदे, हातडी, ता. परतूर, जि. जालना.

टॅग्स :JalanaजालनाAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Social Mediaसोशल मीडिया