शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पळसखेडा शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

जैवाळ यांची तालुका अध्यक्षपदी निवड जालना : प्रहार लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या जालना तालुकाध्यक्षपदी कृष्णा जैवाळ तर सचिवपदी श्रीहरी सोळंके ...

जैवाळ यांची तालुका अध्यक्षपदी निवड

जालना : प्रहार लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या जालना तालुकाध्यक्षपदी कृष्णा जैवाळ तर सचिवपदी श्रीहरी सोळंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सचिन दांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी प्रहार संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख संतोष राजगुरू, जिल्हा उपाध्यक्ष गोलांडे, सचिव डी.एस. साबळे आदींची उपस्थिती होती.

अंतरवाली येथे महंत भोजने बाबांचे स्वागत

अंबड : तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे महंत भोजने बाबा यांनी भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महंत बठाणकर बाबा कोल्हे, चक्रपाणीबाबा, सुधाकर बाबा नागराज, गोविंदराज गुर्जर आदींची उपस्थिती होती. गावातील श्री दत्त प्रसादीक भजनी मंडळाने भजन सादर करीत या मिरवणुकीत सहभाग नोंदविला.

महावितरण विरोधात आंदोलनाचा इशारा

हसनाबाद : कोणतीही पूर्वसूचना न देता, कृषिपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महाविरणकडून तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा हसनाबाद व परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. हसनाबाद येथील कार्यालयात निवेदन देताना गजानन इंगळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित हेाते.

बंदींना भेटण्याची प्रशासनाकडून परवानगी

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदींना नातेवाइकांना भेटण्यासाठी मनाई करण्यात आली होती. गत काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. लॉकडाऊनमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कारागृहातील कैद्यांना भेटण्यास त्यांच्या नातेवाईकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे नातेवाइकांची होणारी गैरसोय दूर करण्यात आता मोठी मदत होणार आहे, शिवाय पोलिसांची डोकेदुखीही थांबणार आहे.

चोरट्यांनी पळविली दानपेटीतील रक्कम

भोकरदन : तालुक्यातील तडेगाव येथील समर्थ पांडुरंग संस्थानच्या मंदिरातील दानपेटी शुक्रवारी रात्री चोरट्यांनी फोडली. यावेळी चोरट्यांनी दानपेटीतील जवळपास ७५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी मधुकर मुगुटवार यांनी दिलेल्या तक्ररीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस कर्मचारी सुरडकर हे करीत आहेत.