अतिवृष्टी अनुदानाचे ९४ कोटी रूपये वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:47+5:302020-12-27T04:22:47+5:30
विजय मुंडे जालना : अतिवृष्टीने बाधित पिकांच्या नुकसान अनुदानाचे जिल्हा बँकांच्या शाखांमधून वाटप सुरू आहे. आजवर जिल्हा बँकेने ५६६ ...

अतिवृष्टी अनुदानाचे ९४ कोटी रूपये वाटप
विजय मुंडे
जालना : अतिवृष्टीने बाधित पिकांच्या नुकसान अनुदानाचे जिल्हा बँकांच्या शाखांमधून वाटप सुरू आहे. आजवर जिल्हा बँकेने ५६६ गावातील २ लाख १५ हजार १७३ शेतकऱ्यांना ९४ कोटी २० लाख रूपये अनुदानाचे वाटप केले आहे.
अतिवृष्टीमुळे यंदा शेतकऱ्यांच्या पिकांची माती झाली नव्हे नदीकाठी असलेल्या शेतजमिनीतील मातीच पाण्यासोबत वाहून गेली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या पंचनाम्यानंतर शासनस्तरावरून मदतीची घोषणा करण्यात आली. शासनकडून प्राप्त अनुदानापैकी १३६ कोटी ९१ लाख ३५ हजार रूपयांचे अनुदान जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आले होते. बँकेने ८६३ गावातील ३ लाख ३८ हजार ५२५ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग केले आहे. वर्ग केलेल्या अनुदानापैकी आजवर ५६६ गावातील २ लाख १५ हजार १७३ शेतकऱ्यांना ९४ कोटी २० लाख रूपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यात जालना तालुक्यातील १६ हजार ८५३ शेतकऱ्यांना ९ कोटी ६७ लाख ९७ हजार रूपये, बदनापूर तालुक्यातील १० हजार ४६१ शेतकऱ्यांना ५ कोटी ८ लाख २६ हजार रूपये, अंबड तालुक्यातील ४५ हजार २१० शेतकऱ्यांना २० कोटी ७२ लाख रूपये, घनसावंगी तालुक्यातील ५३ हजार ८२५ शेतकऱ्यांना २८ कोटी २७ लाख ४७ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. तर भोकरदन तालुक्यातील ३४ हजार ३३३ शेतकऱ्यांना ६ कोटी ५६ लाख ५१ हजार रूपये, जाफराबाद तालुक्यातील ९९८६ शेतकऱ्यांना २ कोटी ७९ लाख ७१ हजार रूपये, परतूर तालुक्यातील २१ हजार ५६५ शेतकऱ्यांना १० कोटी ७ लाख ६१ हजार रूपये तर मंठा तालुक्यातील २२ हजार ९४० शेतकऱ्यांना ११ कोटी सात हजार रूपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
५६६ गावातील लाभार्थ्यांना लाभ
शासनस्तरावरून जिल्ह्यातील ८६३ गावातील ३ लाख ३८ हजार ५२५ शेतकऱ्यांसाठी १३६ कोटी ९१ लाख ३५ हजार रूपये मंजूर झाले आहेत. पैकी ५६६ गावातील ९४ कोटी २० लाख २४ हजार रूपये वाटप करण्यात आले आहेत.
अपुरे कर्मचारी अन् तांत्रिक समस्या
जिल्हा बँकेतील अपुरे कर्मचारी आणि शाखास्तरावर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनुदान वाटपाची गती रोडावली आहे. याचा त्रास ग्रामीण भागातील शेतकरी, ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या समस्या सोडविण्याची गरज आहे.
किसान सन्मानचे २० कोटी जमा
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे २० कोटी ७४ लाख रूपयेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. याचा जिल्ह्यातील एक लाख ३ हजार ७११ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
लवकरच पूर्ण वाटप
शासनाकडून आलेले सर्वच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. त्यातील ६८ टक्के रकमेचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित अनुदान पुढील आठवड्यापर्यंत वाटप होईल. शाखा स्तरावरील समस्याही लवकरच सोडविण्यात येतील.
आशुतोष देशमुख
कार्यकारी संचालक, जिल्हा बँक