विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST2020-12-28T04:16:31+5:302020-12-28T04:16:31+5:30
धुळीमुळे चालक हैराण जालना : शहरातील शनिमंदिराच्या पुढील मार्गावरील उड्डाणपुलापासून अंबड चौफुलीपर्यंत मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या ठिकाणी ...

विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
धुळीमुळे चालक हैराण
जालना : शहरातील शनिमंदिराच्या पुढील मार्गावरील उड्डाणपुलापासून अंबड चौफुलीपर्यंत मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या ठिकाणी टाकलेला मुरुमही बाजूला झाला असून, चालकांना कसरत करीतच वाहने चालवावी लागत आहेत. उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांसह प्रवासी, व्यावसायिकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
बजरंग दलाची बैठक
तीर्थपुरी: घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे बजरंग दलाची बैठक घेण्यात आली. यावेळी साधू-संतांवरील हल्ल्यांसह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस राजेंद्र चिमणे, रामेश्वर बोबडे, संजय मापारे, राम बनकर, रमेशराव गाडेकर, हरी वजे, अनिल जाधव, महादेव वजे, किरण जैन, शंकर ताटे, विलास शिंदे, अजय माारे, वैभव कडूकर, नागराज भालशंकर, दत्ता गिराम, शरद मडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.