शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

चार वर्षे झोपा काढल्या का?; विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 1:27 PM

धामना धरणाच्या सांडव्याची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाहणी केली.

ठळक मुद्देधरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षापासून वाढलेली झाडे दिसली. केंद्रेकरांचा हा अवतार बघून अधिकाऱ्यांमध्ये शांतता पसरली होती

भोकरदन (जि. जालना) : धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षांपासून झाडे  वाढत असताना तुम्ही काय झोपा काढत होते का, असा सवाल करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. धामना धरणाच्या सांडव्याची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी आ. संतोष दानवे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव, तहसीलदार संतोष गोरड, गटविकास अधिकारी अरूण चौलवार यांच्यासह सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या भोकरदन तालुक्यावर आठवडाभरापासून पावसाची कृपा झाली आहे. मुसळधार पावसामुळे केळना, जुई या नद्या खळाळत्या झाल्या असून, परिसरातील धरणांतील पाणी झपाट्याने वाढले आहे. चार ते पाच वर्षांपासून कोरडे पडलेले शेलूद येथील धामना धरण तुडूंब भरले असून, धरणाच्या आणि सांडव्याच्या भिंतीला तडे गेल्याने पाणी वाहून जात आहे. दरम्यान, यामुळे धरण फुटण्याच्या चर्चा परिसरात सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरूवारी धरणाला भेट दिली. 

आयुक्त केंद्रेकर यांनी दोन किमी परिसरात असलेल्या धरणाच्या भिंतीची पाहणी केली. यावेळी त्यांना धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षापासून वाढलेली झाडे दिसली. तसेच भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेल्याचे दिसून आल्याने आयुक्तांचा पारा चढला. चार वर्ष तुम्ही काय झोपा काढत होता, काय, अशी विचारणा करीत आयुक्तांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे कान उपटले. काही दुर्घटना घडल्यास कोणाचीही हयगय करणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. केंद्रेकरांचा हा अवतार बघून अधिकाऱ्यांमध्ये शांतता पसरली होती. धरण फुटणार, अशी अफवा पसरल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. त्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीही धरणाला भेट देऊन पाहणी केली होती.

लष्कराची एक तुकडी दाखल; ताडपत्री टाकून थांबवले पाणीपाहणीनंतर आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी धरण परिसरात २४ तास खडा पहारा ठेवण्यासह विद्युत पुरवठ्याची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. दरम्यान, सैन्यदलाची एक तुकडी मेजर गौरव यांच्या मार्गदर्शनाखाली शेलूद येथे दाखल झाली आहे. पाटबंधारे विभागाने धरणाच्या ज्या ठिकाणाहून पाणी गळती होत होती. ती गळती थांबवण्यासाठी ताडपत्री टाकली आहे. त्यामुळे पाणी गळतीचा वेग कमी झाला असून, सांडव्यातून पाणी जात आहे. गुरुवारी पाऊस थांबल्याने धरणात येणारा पाण्याचा ओघ थांबला आहे. त्यामुळे धोका कमी झाल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :DamधरणDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयJalanaजालनाWaterपाणी