तळीरामाचा मुख्य रस्त्यावर धिंगाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:57 IST2021-02-21T04:57:12+5:302021-02-21T04:57:12+5:30
राजूर : एका तळीरामाने शनिवारी दुपारी राजूर- जालना मुख्य रस्त्यावरील पोलीस चौकीसमोर दुचाकी आडवी लावून धिंगाना घातला. यामुळे वाहतुकीची ...

तळीरामाचा मुख्य रस्त्यावर धिंगाना
राजूर : एका तळीरामाने शनिवारी दुपारी राजूर- जालना मुख्य रस्त्यावरील पोलीस चौकीसमोर दुचाकी आडवी लावून धिंगाना घातला. यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे पंधरा मिनिट रस्त्यावर तळीरामाचा गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांनी धाव घेवून तळीरामाला उचलून नेले. पोलीस चौकीसमोरच तळीराम धिंगाणा घालत असल्याने पोलिसांसमोर दारूबंदीचे आव्हान निर्माण झाले आहे.
जालना ते भोकरदन हा राज्य महामार्ग आहे. या रस्त्यावर वाहनांची कायम वर्दळ असते. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका तळीरामाने पोलीस चौकीसमोरील मुख्य रस्त्यावर स्वत:ची दुचाकी आडवी लावून धिंगाना घातला. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. ऐन पोलीस चौकीसमोर तळीरामाने ठिय्या घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बाजारपेठेत एकेरी वाहतूक असल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. यामुळे भोकरदनहून आलेल्या रूग्णवाहिकेला अडकून पडावे लागले होते. काही लोकांनी तळीरामाला बाजूला करून रूग्णवाहिकेला वाट दिली.
चक्क दारूबंदी करण्याची केली मागणी
काही लोकांनी तळीरामाला रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जोपर्यंत राजूर येथील विनापरवाना देशी दारूविक्री बंद होत नाही, तो पर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, असा पवित्रा त्याने घेतला होता. पोलीस चौकीसमोर बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी धाव घेवून तळीरामाला उचलून पोलीस चौकीत नेले.
===Photopath===
200221\20jan_58_20022021_15.jpg~200221\20jan_59_20022021_15.jpg
===Caption===
राजूर येथे पोलीस चौकी समोर तळीरामाने धिंगाना केल्यामुळे झालेली बघ्याची गर्दी~तळीरामाला उचलून नेतांना पोलीस कर्मचारी