शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

भाजपच्या वतीने जालना  जिल्हाभरात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:30 PM

महाआघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाआघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शासनविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजूळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरर्गे, शहराध्यक्ष राजेश राऊत, सिध्दीविनायक मुळे, संदीप जाधव, परसराम वनिकर, चव्हाण, शशिकांत घुगे आदींची उपस्थिती होती.बदनापूरमध्ये घोषणाबाजीबदनापूर : येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात तालुकाध्यक्ष भीमराव भुजंग, बद्रीनाथ पठाडे, वसंत जगताप, पद्माकर जºहाड, हरिश्चंद्र शिंदे आदींची उपस्थिती होती.घनसावंगीत धरणेतीर्थपुरी : घनसावंगी तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात माजी आमदार विलास खरात, तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी देवनाथ जाधव आदी उपस्थित होते.परतूर येथे आंदोलनपरतूर : येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहूल लोणीकर, भगवान मोरे, रमेश भापकर, रामप्रसाद थोरात, विलास आकात शत्रुघ्न कणसे आदींची उपस्थिती होती.जाफराबाद तहसीलजाफराबाद : येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, जिल्हा परिषद सदस्य शालीकराम म्हस्के, माजी अध्यक्ष गोविंदराव पंडित, संतोष लोखंडे उपस्थित होते.अंबडमध्ये आंदोलनअंबड : येथे करण्यात आलेल्या आंदोलनात दीपकसिंह ठाकूर, राजेंद्र ठोसर, संदीप खरात, जितेंद्र पालकर, सौरभ कुलकर्णी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.भोकरदन : तहसील परिसर दणाणलाभोकरदन : महाआघाडी शासनाच्या धोरणांविरोधात भाजपच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता.मागण्यांचे निवेदन तहसीलदार संतोष गोरड यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख, जि. प. सदस्या आशा पांडे, पं. स. सभापती विनोद गावंडे, जि. प. सदस्य चंद्रकांत साबळे, जि. प. सदस्य तुकाराम जाधव, जि. प. सदस्या सुनीता सपकाळ, जि. प. सदस्य अजिंक्य वाघ आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी