शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

धामणा प्रकल्प ओव्हरफ्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:39 IST

शेलूद येथील धामणा धरण शनिवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण शनिवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी धरणाची पाहणी करून अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर धरणाच्या सांडव्याला लागलेली गळती थांबविणे व इतर दक्षतेच्या उपाययोजनांसाठी अधिकाऱ्यांनी प्रकल्पावरच ठाण मांडले आहे.धामणा धरणाच्या सांडव्यातून पाणी गळती सुरू होती. त्यामुळे धरण फुटण्याच्या अफवेने सर्वत्र भीतीचे वातावरण होते. यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आ. संतोष दानवे, अधीक्षक अभियंता तारक, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, माजी आमदार चंद्रकांत दानवे, तहसीलदार संतोष गोरड, गटविकास अधिकारी डॉ अरुण चोलवार यांनी ४ व ५ जुलै रोजी धरणावर जाऊन गळतीची पाहणी केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाने ताडपत्री टाकून गळतीचे प्रमाण कमी केले. शिवाय विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे नदीचे खोलीकरण सुरू केले आहे. त्याचप्रमाणे या धरणाच्या भिंतीवर असलेली झाडे काढण्याचे काम सुरू आहे. मात्र शनिवारी धरण्याच्या वरच्या भागात पाऊस झाला आणि पाण्याचा ओघ वाढत गेला. त्यामुळे धरण ओसंडून वाहत आहे. पाऊस वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे तहसीलदार संतोष गोरड व विविध विभागाचे अधिका-यांसह २० ते २५ कर्मचाºयांचा ताफा धरणावर ठाण मांडून आहे. शिवाय भोकरदन नगर परिषदची अग्निशमन पथक, बोट ही शेलूद गावात दाखल झाले आहे. दरम्यान, धामणा मध्यम भरल्याने दोन सेंटीमीटर (विसर्ग) सांडव्यावरुन अल्पत: ओहरफ्लो होत आहे. या प्रकल्पाच्या धरणाच्या खालील नदी काठावरील गावातील नागरिकांनी जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी सतर्कता बाळगावी. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.दानापूरचे जुई धरण भरण्याच्या मार्गावरभोकरदन तालुक्यात पडलेल्या दमदार पावसामुळे जुई, धामणा व पद्मावती या तिन्ही धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. धामणा धरण आज ओव्हरफ्लो झाले. तर जुई धरणात १६ फूट पाणीसाठा झाला आहे.केवळ १ फूट धरण भरण्यासाठी बाकी असून, पद्मावती धरणात जवळपास ६० टक्के पाणी आले आहे. जुई धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने भोकरदन शहरासह २५ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.१० गावांचा पाणीप्रश्न मार्गीधामणा धरणात सध्या १०.७२ दलघमी पाणी साठा आहे. या धारणावरून १० गावांना पाणीपुरवठा होतो. तर १ हजार ७८८ हेक्टर क्षेत्र सिंचन खाली येते. मराठवाड्यात सर्वात प्रथम शेलूद येथील धामण धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊसriverनदी