पाणी असूनही पिके करपू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:33 IST2018-10-10T00:32:23+5:302018-10-10T00:33:03+5:30
अंबड तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला खरिपातील पिके जगविण्यासाठी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले. परंतु महा लोडशेडींगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

पाणी असूनही पिके करपू लागली
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला खरिपातील पिके जगविण्यासाठी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले. परंतु महा लोडशेडींगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
परतीच्या पावसाचा प्रवास संपल्याने पाऊस येईल, हि अशाही कोरडी पडली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीलाच आलेल्या जेमतेम पावसावरच शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. परंतु, पाऊस नसल्याने कपाशी, ऊस, तुर, मूग, बाजरी, सोयाबीन आदी पिकांची मोठ्या प्रमाणात वाढ खुंटली तर बहुतांश ठिकाणी ऊभी पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. परतीच्या पावसाने ही दिलासा दिला नाही. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जेमतेम राहिलेले पिकेही तीव्र उन्हामुळे वाळून केली. तूर व कपाशीचे पाते व फुले गळून पडत आहेत. शेतकºयांची पिके वाचावी यासाठी प्रशासनाने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला आठ दिवसापासून सोडले. परंतु, वारंवार वीज जात असल्याने या पाण्याचा उपयोग मात्र होताना दिसत नाही. महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार व नियोजनाचा अभाव असल्याने गेल्या आठ दिवसापासून एक तास हि सुरळीत वीज पुरवठा झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे कालव्यातून पाणी उपसा करणाºया शेतकºयांना एक गुंठा हि क्षेत्र या आठ दिवसात भिजवता आले नाही.
कृषी पंपासाठी वीज पुरवठा करणाºया विद्युत वाहिन्यांमध्ये नेहमी बिघाड होऊन वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच अपुºया वीज दाबामुळे कृषी पंप चालत नसल्याने या परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
शेतकरी हैराण
कालव्याला पाणी असूनही कृषी पंपाला वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पिके डोळ््यात देखत वाळून जात असल्याने शेतकºयांची अवस्था केविलवाणी झाली आहे.
याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.
जालना : लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची मागणी
शेतकºयांना शेतीसाठी डाव्या कालव्याला पाणी सोडले खरे, पण विज गुल होत आहे. एका हाताने दिले, दुसºया हाताने नेले, अशी म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. इतर वेळी कुठल्याही कामावरून श्रेयबाजीसाठी पुढे येणारे राजकीय नेते शेतकºयांच्या या प्रश्रांवर गप्प का बसले? का कोणी वीजपुरवठा सुरळीतपणे सुरु करण्यास पुढे येईना? असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे.