निजामाच्या वंशजांनी घेतली दानवेंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:24 IST2018-01-15T00:24:10+5:302018-01-15T00:24:23+5:30
हैदराबादच्या निजामाच्या तिस-या पिढीतील वंशजांनी रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली़

निजामाच्या वंशजांनी घेतली दानवेंची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : हैदराबादच्या निजामाच्या तिस-या पिढीतील वंशजांनी रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली़
मकरसंक्रांतीचा सण असल्यामुळे खा़ रावसाहेब दानवे हे भोकरदन येथील निवासस्थानी होते.
सकाळी राज्य व जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देत असताना, निजामाचे तिसरे वंशज नवाब नजफअली (हैदराबाद), नवाब करमअली (लंडन), नवाब हबीब अली (अमेरिका) व नजफअली यांचा मुलगा नवाब मोहम्मद अनसअली तसेच जालन्याचे नेते एकबाल पाशा हे दानवे यांच्या निवासस्थानी पोहोचले.