जालना : जालनेकर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करत आहेत, असे असताना पैठण ते पाचोड दरम्यानचे काही पाणीचोर मात्र, या जालन्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारून दररोज ७० लाख लिटर पाण्याची चोरी करत असल्याचे पाहीनीतून उघड झाले आहे. पाणीचोरी करणाऱ्यांवर आता हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.गेल्या काही वर्षापासून हा पाणी चोरांचा गोरखधंदा सुरू होता. त्यावर नियंत्रणासाठी २४ जानेवारीला देखील अशीच अचानक पाहणी पालिकेच्या पथकाने केली होती. त्यावेळी आठ शेतकºयांनी व्हॉल्व मधून पाण्याची चोरी करून शेततळी तसेच स्वत:च्या विहिरीत ते पाणी साठवून नंतर त्यांची विक्री करण्याचा धंदा त्यांनी चालविला होता.दरम्यान जालना पालिकेने जिल्हाधिकाºयांच्या कानावर ही बाब घातल्यावर त्यांनी लगेचच आयुक्तांना ही माहिती दिली. त्यानुसार गुरूवारी अचानक पाहणी केली असता, मोठी धक्कादायक बाब समोर आली. ज्या आठ शेतकºयांवर यापूर्वीच पाचोड ठाण्यात गुन्हे दाखल होते, त्यांनी त्यांचा पाणी चोरीचा धंदा सुरूच ठेवल्याचे उघड होऊन आणखी चार शेतकºयांची त्यात भर पडली.या बारा जणांविरूध्द आता पाचोड पोलिस ठाण्यात पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बगळे यांच्या तक्रारीवरून अजामिनपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.गुरूवारी केलेल्या पाहणीच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी पैठणचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, पैठणचे तहसीलदार महेश सावंत, पाचोडचे पोलीस निरीक्षक मोरे, पाणीपुरवठा सभापती रमेश गोरक्षक, नगर अभियंता राजेश बगळे, संजय राजाळे, विनोद चव्हाण यांच्यासह २० पोलीस कर्मचाºयांची उपस्थिती होती.पत्रकार परिषदेस माजी आ. कैलास गोरंट्याल, सभापती रमेश गौरक्षक, नगरसेवक शाह आलम खान, विजय चौधरी, महावीर ढक्का, विनोद यादव, गणेश चौधरी आदींची उपस्थिती होती.हे आहेत पाणीचोरपैठण ते जालना दरम्यान असलेल्या पाईपालाईनच्या व्हॉल्व मधून पाण्याची चोरी करणाºयांमध्ये अशोक निर्मल, बबन कर्डिले (लिंबगाव), अप्पासाहेब रामराव शेरकर, श्रीमंत भानुदास लबडे, सोमनाथ अण्णासाहेब निर्मल, एकनाथ रंगनाथ कोल्हे, अनिल भगिरथ भवरे, संतोष आगळे, घायाळ, तळवे, हजारे (पाचोड) यांचा समावेश आहे.या १२ जणांपैकी पहिले एक ते सात जणांवर यापूर्वी पाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी व्हॉल्व फोडून जवळपास पाईपालाईनचे ३९ लाख रूपयांचे नुकसान केले आहे.
जालन्याचे पाणी चोरणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:01 IST
जालनेकर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करत आहेत, असे असताना पैठण ते पाचोड दरम्यानचे काही पाणीचोर मात्र, या जालन्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारून दररोज ७० लाख लिटर पाण्याची चोरी करत असल्याचे पाहीनीतून उघड झाले आहे.
जालन्याचे पाणी चोरणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई व्हावी
ठळक मुद्देनगराध्यक्षा संगीता गोरंट्याल : १२ जणांवर पाणी चोरीचे गुन्हे