मानधनात वाढ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:56 IST2019-06-18T00:55:09+5:302019-06-18T00:56:00+5:30
सोमवारी राज्य अंगणवाडी - बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मानधनात वाढ करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने घोषित केलेल्या मानधनात वाढ करावी, तसेच थकित इंधन बिल व थकित प्रवास भात्ता तात्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी राज्य अंगणवाडी - बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले.
यावेळी कॉ. देविदास जिगे, कविता पाचरणे, बाबासाहेब जिगे, अलका धर्माधिकारी, अनिता वनारसे, छाया जाधव, मधुकर वाघमारे, जनार्दन वराडे, सविता देशमुख, उषा मगरे, अलका पुरी, जया शिरसाट, उज्ज्वला सर्जे, कविता सातभर्द्रे, कडूबाई आरगडे, जुगना चाऊस, अश्विनी कुलकर्णी, शोभा तौर, मंगल पगारे, सविता देशमुख, सरस्वती शिंदे, वंदना मरकड, अनिता पगारे, अभिमन्यू लोखंडे यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्ती उपस्थित होत्या.