सावित्रीज्योती मालिका सुरु ठेवण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST2020-12-26T04:24:33+5:302020-12-26T04:24:33+5:30
टेंभुर्णी : महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत एका मराठी वाहिनीवर सुरु असलेली सावित्रीज्योती मालिका ...

सावित्रीज्योती मालिका सुरु ठेवण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची मागणी
टेंभुर्णी : महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत एका मराठी वाहिनीवर सुरु असलेली सावित्रीज्योती मालिका पुरेशा प्रतिसादा ऐवजी बंद करण्यात येत आहे. महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी या महत्वपूर्ण मालिकेसाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी क्रांतीसेनेचे विभाग प्रमुख रावसाहेब अंभोरे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या ऑनलाइन पत्रात म्हटले आहे की, महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत सावित्रीज्योती ही मालिका एका मराठी वाहिनीवर मागील काही महिन्यांपासून प्रदर्शित होत आहे. या मालिकेद्वारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवन व समाजकार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात आहे. या मालिकेचे अद्याप १०० भाग प्रदर्शित होण्याचे बाकी असल्याचे म्हटले आहे. ग्रामीण भागातील अनेकजण ही मालिका मोठ्या आवडीने पाहत असतानाही प्रेक्षांच्या अपुºया प्रतिसादामुळे ही मालिका बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाने या ऐतिहासिक मालिकेला अर्थसाहाय्य देवून ज्योती- सावित्रीचा हा वसा घराघरांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही अंभोरे यांनी म्हटले आहे.