दीपक चौधरी यांची तडकाफडकी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:40 IST2018-01-08T23:40:37+5:302018-01-08T23:40:59+5:30
जालना : जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.बी. बेदमुथा यांच्याकडे ...

दीपक चौधरी यांची तडकाफडकी बदली
जालना : जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.बी. बेदमुथा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बेथमुथा यांनी सोमवारी दुपारी पदभार स्वीकारला.
जि.प.चे सीईओ दीपक चौधरी यांच्यावर महिला अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर चौधरी यांना पोलिसांनी अटक करून जामिनावर सोडले होते. या घटनाक्रमानंतर ग्रामविकास विभागाचे उपसचिव वि. द. शिंदे यांच्या आदेशानुसार चौधरी यांची सेवा ग्राम विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी सीईओ पदाचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बेदमुथा यांच्याकडे सोपविण्याचे चौधरी यांना आदेशित केले होते. त्यानुसार चौधरी यांनी बेदमुथा यांच्याकडे पदभार सोपवून तसा कार्यपालन अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला.