विद्युत खांब अंगावर पडल्याने मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:05 IST2019-12-23T00:04:42+5:302019-12-23T00:05:27+5:30
विद्युत खांब अंगावर पडल्याने एका ५१ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ही घटना घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव शिवारात रविवारी सायंकाळी घडली.

विद्युत खांब अंगावर पडल्याने मजुराचा मृत्यू
तीर्थपुरी : विद्युत खांब अंगावर पडल्याने एका ५१ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ही घटना घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव शिवारात रविवारी सायंकाळी घडली.
भोकरदन तालुक्यातील बाणेगाव शिवारातील शेतात विद्युत खांब उभारणीचे काम सुरू आहे. घुंगर्डे हादगाव येथील कामगार विठ्ठल रामभाऊ बहिर (५१) हे रविवारी सायंकाळी खांब उभा करीत होते. त्याचवेळी अचानक खांब अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. संजू ढवळे यांनी प्रेताची उत्तरीय तपासणी केली. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस चौकीमध्ये नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ श्रीधर खडेकर, भागवत शिंदे हे करत आहेत. मयत विठ्ठल बहिर यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, चार मुली असा परिवार आहे.