कुंभार पिंपळगावात दासबोध चक्री पारायणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:50 AM2018-12-05T00:50:03+5:302018-12-05T00:50:18+5:30

जांब समर्थ येथे चैतन्य ज्ञानपीठ अंतर्गत समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु: शताब्दी प्रबोधन समितीच्या वतीने चातुमार्सानिमित्त घेण्यात आलेल्या दासबोध चक्री परायणाची सांगता मंगळवारी झाली.

Dashbodh Chakri Parineyacha in Kumbhar Pimplagaon | कुंभार पिंपळगावात दासबोध चक्री पारायणाची सांगता

कुंभार पिंपळगावात दासबोध चक्री पारायणाची सांगता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे चैतन्य ज्ञानपीठ अंतर्गत समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु: शताब्दी प्रबोधन समितीच्या वतीने चातुमार्सानिमित्त घेण्यात आलेल्या दासबोध चक्री परायणाची सांगता मंगळवारी झाली.
यावेळी अध्यक्षस्थानी चैतन्य ज्ञानपीठाचे अध्यक्ष डॉ.जगदीश करमळकर हे होते तर महाव्यवस्थापक महेशचंद्र कवठेकर, हभप पांडुरंग महाराज आनंदे , बाळासाहेब नाईक , समर्थ मंदिराचे विश्वस्त महेश साकळगावकर, मुकुंद गोरे, सूर्यकांत कुलकर्णी, विनायक देशपांडे, रवींद्र भामरे, दिलीप कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती , कार्यक्रमाची सुरुवात समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलनाने करण्यात आली, यावेळी दिलीपराव कस्तुरे व जगदीश करमळकर यांनी विचार मांडले, दरम्यान विश्वहिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब नाईक यांचा चैतन्य ज्ञानपीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला व स्वर्गीय समर्थ भक्त सुनील चिंचोलकर व सुहास आगरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काही पारायणकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधन समितीचे अध्यक्ष विनायक देहेडकर यांनी केले, सूत्र संचालन सुरेशराव पाटोदकर यांनी केले तर सुहास बीडकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला सुरेश नांदेडकर, अशोक शेलगावकर , प्रकाशराव तांगडे, बाबासाहेब तांगडे, माजी सरपंच विलास तांगडे, विनायक दसरे, गुलाबराव तांगडे, रामकीसन मोगरे , यांच्यासह दोन ते अडीच हजार समर्थ भक्तांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावकऱ्यांची मोठी साथ मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरवर्षी हा उपक्रम हाती घेण्यात येतो.

Web Title: Dashbodh Chakri Parineyacha in Kumbhar Pimplagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.