धोकादायक पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST2021-08-02T04:11:26+5:302021-08-02T04:11:26+5:30

कलावंतांचा सत्कार जालना : लघुपटात काम करणाऱ्या जालना जिल्ह्यातील कलावंतांचा भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सुमित ...

Dangerous pool | धोकादायक पूल

धोकादायक पूल

कलावंतांचा सत्कार

जालना : लघुपटात काम करणाऱ्या जालना जिल्ह्यातील कलावंतांचा भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सुमित कुलकर्णी, राजेश दाभाडकर, दीपा बिनिवाले, जान्वही वैद्य, ज्योती जोशी, अपर्णा राजे, संपदा कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

पादचाऱ्यांची गैरसोय

अंबड : शहरातून जाणाऱ्या जालना- बीड महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतून रस्ता शोधताना पादचारी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. शिवाय अपघाताचाही धोका वाढला आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी होत आहे.

पथदिवे बंदच

जाफराबाद : शहरांतर्गत विविध भागांतील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी गैरसोय होते. शिवाय भुरट्या चोऱ्याही वाढल्या आहेत. ही बाब पाहता संबंधितांनी लक्ष देऊन बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

रस्त्याची दुरवस्था

बदनापूर : शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे चालकांना कसरत करावी लागत असून, प्रवाशांचाही जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Dangerous pool