तहसीलदारांकडून नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:30 IST2021-02-20T05:30:29+5:302021-02-20T05:30:29+5:30
तालुक्यातील नळविहिरा, खामखेडा, सावंगी, गोंधनखेडा, भातोडी, हिवरा, बोरखेडी, आळंद, सावरगाव, काळेगाव, खानापूर, कुंभारझरी, डोलखेडा, वरखेड, निवडुंगा, आंबेगाव आदी गावांत ...

तहसीलदारांकडून नुकसानीची पाहणी
तालुक्यातील नळविहिरा, खामखेडा, सावंगी, गोंधनखेडा, भातोडी, हिवरा, बोरखेडी, आळंद, सावरगाव, काळेगाव, खानापूर, कुंभारझरी, डोलखेडा, वरखेड, निवडुंगा, आंबेगाव आदी गावांत गुरुवारी दुपारी अचानक गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, कांद्यासह आंबा व आवळ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार सतीश सोनी यांनी शुक्रवारी नुकसानग्रस्त गारखेडा, टाकली, बोरखेडी, जवखेडाठेंग, गोंधनखेडा, खामखेडा या गावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच दोन दिवसात मंडळ पंचनामा करणार असल्याचे तहसीलदार सतीश सोनी यांनी सांगितले. या प्रसंगी नायब तहसीलदार केशव डकले, मंडळ अधिकारी भदरगे, कृषी सेवक दीपक दूनगहू, तलाठी स्वप्नील बावणे, शेतकरी रामदास जाधव, प्रकाश फदाट, रामदास फदाट, भगवान सुसर, साहेबराव पंडित, कृष्णा फदाट, नितीन जाधव आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
===Photopath===
190221\19jan_26_19022021_15.jpg
===Caption===
जाफराबाद येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना तहसीलदार सतीश सोनी व इतर अधिकारी.