दोन तलवारींसह खंजिर जप्त; जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By विजय मुंडे | Updated: June 27, 2023 19:56 IST2023-06-27T19:56:06+5:302023-06-27T19:56:25+5:30
या प्रकरणात संबंधिताविरूद्ध सदरबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन तलवारींसह खंजिर जप्त; जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जालना : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाविरूद्ध कारवाई करून दोन तलवारींसह एक खंजिर जप्त केले. ही कारवाई मंगळवारी सकाळी शहरातील पेन्शनपुरा भागात करण्यात आली असून, या प्रकरणात संबंधिताविरूद्ध सदरबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका युवकाचा सोमवारी रात्री खून झाला होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकाला सलमान अब्दुल सलीम शेख (रा. पेन्शनपुरा जालना) याच्याकडे तलवारी असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार पथकाने मंगळवारी सकाळी सलमान शेख याच्या घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी दोन धारदार तलवारी, एक खंजिर आढळून आला. पोलिसांनी तलवारी, खंजिर जप्त केल्या असून, शेख याला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात हवालदार कृष्णा तंगे यांच्या तक्रारीवरून सलमान अब्दुल सलीम शेख विरूद्ध सदरबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि. रामेश्वर खनाळ, पोहेकॉ. सॅम्युअल कांबळे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, गोपाल गोशिक, रामप्रसाद पव्हरे, कैलास चेके, योगेश सहाने, धिरज भोसले, रमेश पैठणे, सौरव मुळे यांच्या पथकाने केली.