कडबा कटरमध्ये विद्युतप्रवाह उतरला; दोघा चुलत भावांचा विजेचा धक्का बसून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 18:01 IST2021-09-07T18:00:24+5:302021-09-07T18:01:23+5:30
मशीनमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने दोघांना तीव्र धक्का बसला.

कडबा कटरमध्ये विद्युतप्रवाह उतरला; दोघा चुलत भावांचा विजेचा धक्का बसून मृत्यू
भोकरदन ( जालना ) : तालुक्यातील लिंगेवाडी येथील दोन सख्या चुलत भावंडांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. पवन गजानन घोडे ( २२ ) व सचिन रामकीसन घोडे ( २२ ) अशी मृतांची नावे आहेत.
लिंगेवाडी येथील पवन गजानन घोडे आणि सचिन रामकीसन घोडे दुपारी १२ वाजेच्या सुमारास घोडेवाडी वस्तीवर जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले होते. चारा टाकण्यासाठी त्यांनी कडबा कटर (कुटी मशिन) मशिन सुरू केली. मात्र, मशीनमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने दोघांना तीव्र धक्का बसला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोघे जण आले नसल्याने मोठा भाऊ शरद तिकडे गेला. तेव्हा त्याला दोघांचा मृत्यू झाल्याचे दिसले. त्याने आरडाओरडा केला असता ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली.