मोकाट जनावरांचा हैदोस, पिके नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:47 IST2018-11-25T00:46:41+5:302018-11-25T00:47:26+5:30
मोकाट जनावरांनी हैदोस घातला असून, ही जनावरे शेतातील उभी पिके नष्ट करीत आहेत

मोकाट जनावरांचा हैदोस, पिके नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : मोकाट जनावरांनी हैदोस घातला असून, ही जनावरे शेतातील उभी पिके नष्ट करीत आहेत, संतप्त शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ही जनावरे कोंडवाड्यात आणून सोडली आहेत. दरम्यान, या जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी या शेतक-यांनी केली आहे.
परतूर शहरातील नागरीकांसह शेतकरी या मोकाट जनावरांमुळे त्रस्त झाले आहेत. ही जनावरे दिवसभर शहरात रोडवर व रात्री शेतातील पिकांचे नुकसान करत आहेत. दिवसेंदिवस या जनावंराची संख्या वाढत आहे. अगोदरच हरीण, रान डुकर, काळविट यांच्या मुळे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. यातच ही मोकाट जनावरे कळपाने फिरून शेतातील उभे पिक फस्त करीत आहेत. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने, सर्वच पिक हातची गेली आहेत. जी काही अल्पाशा पाण्यावर पिक घेतली आहेत. तीही मोकाट जनावरे अशा पध्दतीने नष्ट करीत आहेत. शुक्रवादी संतप्त शेतक-यांनी मोठया २२ जनावरे पिकाची नासाडी करतांना शेतातून पकडून आणली व नगर पालिकेच्या कोंड वाड्यात घातली. ही जनावरे सहजा सहजी हाती लागत नाहीत. तरी शेतक-यांनी मोठया प्रयत्नाने ही जनावरे पकडली. आता या संतप्त शेतक-यांनी या जनावरांची हर्राशी करून पिकाची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी बापूराव काळे, ए. बी. तेलगड, प्रकाश शिंदे यांनी मुख्याधिका-यांकडे निवेदनाव्दारे केली.