जालन्यात सराईत गुन्हेगाराचा गळा चिरुन खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 11:37 IST2018-10-16T11:37:35+5:302018-10-16T11:37:56+5:30

शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र परिसरात एका युवकाचा गळा चिरुन खून केल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

a criminal's murder in jalana | जालन्यात सराईत गुन्हेगाराचा गळा चिरुन खून

जालन्यात सराईत गुन्हेगाराचा गळा चिरुन खून

जालना : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र परिसरात एका युवकाचा गळा चिरुन खून केल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृताचे नाव दत्ता चंद्रभान उढाण (३०, रा. चंदनझिरा, जालना) असे असून तो सराईत गुन्हेगार होता.

आज सकाळी पोलिसांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्र परिसरात एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली, यावरून चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाची पाहणी केली. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, मृताचे नाव दत्ता उढाण असल्याचे समोर आले. दत्ताचा गळा चिरुन खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मृतदेहाला पोस्टमॅटमसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ही घटना सकाळी चारवाजेच्या सुमारास घडली असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. दरम्यान, दत्ता हा सराईत गुन्हेगार असून सोमवारी रात्री एका  जागरणाच्या कार्यक्रमात त्याचे साथीदारांसोबत भांडण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय अधिकारी ढवळे, पोनि. बाळासाहेब पवार यांच्यासह आदींनी घटनास्थळाची पाहाणी केली.

Web Title: a criminal's murder in jalana