अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:07+5:302021-06-02T04:23:07+5:30

पांगरी खुर्द येथे कुऱ्हाडीने केली मारहाण जालना : सांडपाण्याच्या कारणावरून एकास कुऱ्हाडीने मारहाण झाल्याची घटना मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द ...

Crimes against illegal sand dredgers | अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

पांगरी खुर्द येथे कुऱ्हाडीने केली मारहाण

जालना : सांडपाण्याच्या कारणावरून एकास कुऱ्हाडीने मारहाण झाल्याची घटना मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द येथे घडली. या प्रकरणी बाळासाहेब काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रंगनाथ दशरथ काळे, दौलत दशरथ काळे, महादू दशरथ काळे, अमोल दौलत काळे, महिला यांच्याविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

कटलरीचे दुकान चालू ठेवणाऱ्यावर कारवाई

जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करून कटलरी दुकान चालू ठेवणाऱ्यांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नगर परिषदेचे स्वीय सहायक विजय फुलंब्रीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामताराम जवारामजी चौधरी, दुधारामजी रायमाजी चौधरी (संभाजीनगर, जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक वाव्हळ हे करीत आहेत.

Web Title: Crimes against illegal sand dredgers