Coronavirus : चिंताजनक ! जालन्यात दोघांचा बळी, आठजण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:04 IST2020-07-10T12:03:01+5:302020-07-10T12:04:20+5:30

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ८६० वर गेली आहे

Coronavirus : Worrying! Two deaths in Jalna, eight positive | Coronavirus : चिंताजनक ! जालन्यात दोघांचा बळी, आठजण पॉझिटिव्ह

Coronavirus : चिंताजनक ! जालन्यात दोघांचा बळी, आठजण पॉझिटिव्ह

जालना : रूग्णालयात उपचार घेणा-या दोन कोरोना बाधित रूग्णांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. तर जालना शहरातील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रूग्णालय प्रशासनाकडून गुरूवारी २३२ जणांचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील आठ जणांचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला असून, सहा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर २१८ अहवाल प्रलंबित आहेत.

बाधितांमध्ये जालना शहरातील कादराबाद भागातील सात आणि बरवार गल्लीतील एकाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ८६० वर गेली असून, त्यातील ३७ जणांचा बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ५१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Web Title: Coronavirus : Worrying! Two deaths in Jalna, eight positive