coronavirus: Seven more positive patients in Jalna district | coronavirus : जालना जिल्ह्यात आणखी सात पॉझिटिव्ह रुग्णांची भर

coronavirus : जालना जिल्ह्यात आणखी सात पॉझिटिव्ह रुग्णांची भर

जालना : जिल्ह्यात शुक्रवारी नवीन सात कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात सहा जण जालना शहर तर एक रुग्ण मंठा तालुक्यातील पेवा येथील असल्याचे समजते.दरम्यान जालना जिल्ह्यातील रुग्ण संख्या 51 झाली आहे. तर 11 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.दरम्यान तब्बल दोन महिन्यांनंतर प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व दुकाने खुली राहणार आहेत. आज सायंकाळी बिहार साठी विशेष रेल्वे जालना स्थानकातून सुटणार आहे.

Web Title: coronavirus: Seven more positive patients in Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.