CoronaVirus : कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या शहागडच्या २६ जणांचे अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 14:03 IST2020-04-06T14:02:33+5:302020-04-06T14:03:27+5:30

एकूण ४६ जणांची तपासणी करण्यात येत आहे

CoronaVirus: Negative reports of 26 person in contact with corona positive | CoronaVirus : कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या शहागडच्या २६ जणांचे अहवाल निगेटीव्ह

CoronaVirus : कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या शहागडच्या २६ जणांचे अहवाल निगेटीव्ह

ठळक मुद्देलातूर येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याने खबरदारी

जालना : लातूर येथील पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या शहागड (ता.अंबड) येथील २६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

दिल्ली येथून आंधप्रदेशकडे जाताना शहागड (ता.अंबड) येथे थांबलेल्या १२ जणांपैकी ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. लातूर प्रशासनाकडून अहवाल प्राप्त होताच जालना जिल्हा प्रशासनाने कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या शहागड (ता.अंबड) येथील ४६ जणांना रविवारी जालना येथील जिल्हा रूग्णालयात दाखल  केले होते. तर रविवारी रात्री आणखी आठ जणांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 पहिल्या टप्प्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या २६ जणांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. इतरांच्या स्वॅबचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: CoronaVirus: Negative reports of 26 person in contact with corona positive