coronavirus : जालन्यात मुंबई रिटर्न तिघांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 09:12 IST2020-05-21T09:10:21+5:302020-05-21T09:12:01+5:30

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ४४ वर गेली आहे.

coronavirus: Mumbai return three are coronavirus positive in Jalana | coronavirus : जालन्यात मुंबई रिटर्न तिघांना कोरोनाची बाधा

coronavirus : जालन्यात मुंबई रिटर्न तिघांना कोरोनाची बाधा

जालना : अंबड तालुक्यातील सिध्देश्वर पिंपळगाव येथील मुंबई रिटर्न तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे गुरूवारी सकाळी समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ४४ वर गेली आहे.

मुंबई येथून सिध्देश्वर पिंपळगाव (ता. अंबड) येथे आलेल्या दाम्पत्यासह तिघांना अंबड येथील  रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना जालना येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्हा रूग्णालयात त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्या तिन्ही जणांच्या स्वॅबचा अहवाल गुरूवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे.

 दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४४ झाली असून, पैकी ८ जणांना उपचारानंतर कोविड रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेषत: मालेगाव येथून आलेल्या काही जवानांच्या स्वॅबचे अहवालही आज सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.

Web Title: coronavirus: Mumbai return three are coronavirus positive in Jalana