coronavirus : जालन्यात १७ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:29 IST2020-06-22T11:28:59+5:302020-06-22T11:29:27+5:30
एकूण बाधितांची संख्या आता ३७८ वर गेली आहे.

coronavirus : जालन्यात १७ कोरोनाबाधितांची वाढ
जालना : सोमवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ३७८ वर गेली आहे.
जालना शहरातील सहा जण, अंबड शहरातील एक व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील नऊ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात टेंभुर्णी येथील एका महिला व आठ पुरूष, अंबड शहरातील चांगले नगर येथील एक व्यक्ती, जालना शहरातील मंगल बाजार येथील एक महिला, एक पुरूष, नाथ बाबा गल्लीतील एक व्यक्ती, वाल्मिक नगर भागातील दोन महिला व एसआरपीएफ मधील एका जवानाचा यात समावेश आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात आजवर एकूण ३७८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील ११ जणांचा बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर २४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.