coronavirus : जालन्यात चौदा कोरोनाबाधितांची वाढ; रुग्णसंख्या २१९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 22:55 IST2020-06-08T22:54:58+5:302020-06-08T22:55:39+5:30
जालना शहरातील बालाजीनगर परिसरात ७ बाधीत

coronavirus : जालन्यात चौदा कोरोनाबाधितांची वाढ; रुग्णसंख्या २१९ वर
जालना : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नवीन १४ कोरोना बाधितांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या ही २१९ वर पोचली आहे. दरम्यान पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, १२२ कोरोना बाधित रूग्ण कोरामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी दिली आहे.
सोमवारी प्राप्त अहवालानुसार जालना शहरातील मोदीखाना परिसरातील दोन, बालाजीनगर ७, गुडलागल्ली १, सरस्वती मंदिर परिसर एक रूग्ण आढळला आहे. तसेच जालना तालुक्यातील बेथलम येथे दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथील एका वृध्दाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.