coronavirus : जालन्यात आणखी एका एसआरपीएफ जवानाला कोरोनाची बाधा; रुग्णसंख्या १४ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 13:36 IST2020-05-12T13:35:33+5:302020-05-12T13:36:11+5:30
विशेषत: जालना जिल्ह्यात बाहेरून आलेल्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.

coronavirus : जालन्यात आणखी एका एसआरपीएफ जवानाला कोरोनाची बाधा; रुग्णसंख्या १४ वर
जालना : जालना येथील एसआरपीएफ मधील आणखी एका जवानाचा कोरोना अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. जालना जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या १४ वर गेली आहे. विशेषत: जालना जिल्ह्यात बाहेरून आलेल्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.
मालेगाव येथून बंदोबस्ताहून आलेल्या ६७ जवानांचे अहवाल घेण्यात आले होते. पैकी ६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सोमवारी एका जवानाचा आणि मंगळवारी दुसऱ्या जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेषत: बाधितामधील एक जवान हा अचारी असल्याचे समोर आले आहे. आजवर एसआरपीएफ मधील पाच जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. जालना जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या १४ वर गेली असून, एक महिला कोरोनामुक्त झाली आहे. उर्वतरत १३ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.