coronavirus : जालन्यात २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:29 IST2020-07-01T11:29:04+5:302020-07-01T11:29:36+5:30
एकूण बाधितांची संख्या आता ५८० वर गेली आहे.

coronavirus : जालन्यात २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
जालना : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एकूण बाधितांची संख्या आता ५८० वर गेली आहे.
रूग्णालय प्रशासनाकडून मंगळवारी ८३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. बुधवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये संभाजीनगर मधील एक, जेसीपी बँक कॉलनी भागातील एक, बुºहाणनगरमधील दोन, कन्हैय्यानगरमधील एक, एमआयडीसी भागातील एक, बालाजी नगर मधील दोन, महावीर चौक भागातील एक, साईनगरमधील एक, दानाबाजार भागातील एक, जुना जालना कसबा भागातील दोन, गुरूनगरमधील दोन, कादराबादमधील एक, थात्पुपुरा मधील एक, नबी कॉलनीतील एक, विकास नगरमधील एक, कालीकुर्ती आर.पी. रोडवरील एक, अंबर हॉटेलजवळील एक, नरीमनगरमधील एक, नेहरू रोडवरील एक, देऊळगाव राजा येथील एक, भोकरदन शहरातील दोन, रोहिलागड (अंबड) येथील एक अशा २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, एकूण बाधितांची संख्या ५८० वर गेली असून, त्यातील १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ३५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.