CoronaVirus : जालन्यात ३ एसआरपीएफ जवानासह २ जण पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 23:10 IST2020-05-01T23:09:20+5:302020-05-01T23:10:33+5:30
यामध्ये 3 मालेगाव येथून आलेले एसआरपीएफचे जवान पॉझिटिव्ह

CoronaVirus : जालन्यात ३ एसआरपीएफ जवानासह २ जण पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८ वर
जालना : शहरात 5 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये 3 मालेगाव येथून आलेले एसआरपीएफचे जवान तर अन्य दोन जण हे मुंबई येथून आलेले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एम.के.राठोड यांनी दिली आहे. यासोबतच जालना जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या आता आठवर गेली आहे.
जालना जिल्ह्यात आतापर्यंत एकूण आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील एका महिलेला यापूर्वीच रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर एका महिलेची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, आज आढळून आलेल्या पाचही पॉझिटिव रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे