कोरोनाचा कहर सुरूच, जिल्ह्यात ५५२ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST2021-03-18T04:29:40+5:302021-03-18T04:29:40+5:30

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या चार रूग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. तर बुधवारीच तब्बल ५५२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला ...

Corona devastation continues, 552 affected in the district | कोरोनाचा कहर सुरूच, जिल्ह्यात ५५२ बाधित

कोरोनाचा कहर सुरूच, जिल्ह्यात ५५२ बाधित

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या चार रूग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. तर बुधवारीच तब्बल ५५२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात जालना शहरातील तब्बल ३६२ जणांचा समावेश आहे.

दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात बुधवारी रेकॉर्ड ब्रेक ५५२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील तब्बल ३६२ जणांचा समावेश आहे. तर इंदेवाडी -१, बोरगाव -१, दादावाडी -३, राममूर्ती -६, बठण -२, नागेवाडी -१, कारला -१, निपाणी पोखरी -१, कवठी तांडा -१, पाथरवाला -१, माणेगाव -५, पाथ्रुड -१, निरखेडा -१,वाघ्रुळ -१, कडवंची -१, सिंधी काळेगाव -१, मजरेवाडी -३, साळेगाव -१, डुकरी पिंप्री -१, उटवद -१, रामनगर का-४, सावरगाव -१, भिलपुरी -१, सामनगाव -१, बापकळ येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंठा शहर -२२, बेलोरा -१, पाटोदा -२, ढोकसाळ -१, पाडळी -१, तळणी -१, परतूर शहर -१, वाटूर येथील एकाला बाधा झाली आहे. घनसावंगी शहर -३, राणी उंचेगाव -१, माहेर जवळा -१, पानेवाडी -१, तीर्थपुरी -१, मंगू जळगाव -१, कुंभार पिंपळगाव -१, जांब समर्थ येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. अंबड शहर -१२, नालेवाडी -१, सुखापुरी -१, गोंदी -२, जामखेड -१, मठ पिंपळगाव -१, हस्तपोखरी -१, पागिरवाडी -१, बदनापूर शहर -४, चिकनगाव -१, शेलगाव -१, काजळा -५, ढोकसाळ -१, सिंधी पिंपळगाव -१, दाभाडी -१, चनेगाव -१, असोला -१, महिको येथील आठ जणांना बाधा झाली आहे. जाफराबाद शहर -५, सोनखेडा -१, डोणगाव -१, सातेफळ -१, जानेफळ -१, अकोला येथील एकाला लागण झाली आहे. भोकरदन शहर -९, वरुड -१, राजूर -२, चिंचोली -१, पिंपळगाव रेणुका -२, माळशेंद्रा -१, पारध -१, मसरुळ -१, धावडा -१, वालसावंगी -१, खाडगाव -२, जळगाव सपकाळ -६, वाढोणा -१, केदारखेडा -३, जामखेडा ठोंबरे -२, नळणी -१, चांदई येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर औरंगाबाद -१, बीड -२, बुलढाणा -१३, परभणी -१, अमरावती -१ असे आरटीपीसीआरद्वारे एकूण ३४९ जणांचा तर अँटीजेन तपासणीद्वारे २०३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

१४१५ सक्रिय रूग्ण

कोविड रूग्णालयात सध्या १४१५ सक्रिय रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १९ हजार ६८५ वर गेली असून, त्यातील ४१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रूग्णालयातील उपचारानंतर १७ हजार ८५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

विलगीकरणात १४२ जण

जिल्ह्यातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात १४२ जणांना ठेवण्यात आले आहे. यात राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर बी ब्लॉकमध्ये २७, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर सी ब्लॉक ७७, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर डी ब्लॉकमध्ये २५, घनसावंगी येथील केजीबीव्हीमध्ये १३ जणांना ठेवण्यात आले आहे.

Web Title: Corona devastation continues, 552 affected in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.