कोरोना जनजागृती अभिमानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST2021-02-05T07:58:55+5:302021-02-05T07:58:55+5:30

परतूर : कोरोना काळातील शासनाची कामगिरी, भूमिका अन् नागरिकांसाठी राबविलेल्या विविध योजना यांची माहिती देण्याबरोबर कोरोना आजारांबाबत घ्यावयाची खबरदारी ...

Corona Awareness Pride begins | कोरोना जनजागृती अभिमानाला सुरुवात

कोरोना जनजागृती अभिमानाला सुरुवात

परतूर : कोरोना काळातील शासनाची कामगिरी, भूमिका अन् नागरिकांसाठी राबविलेल्या विविध योजना यांची माहिती देण्याबरोबर कोरोना आजारांबाबत घ्यावयाची खबरदारी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कलापथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक गावोगावी जावून जनजागृती करणार आहे. सोमवारी परतूर तालुक्यातील हातडी येथून या अभियानाला सुरूवात झाली.

महिती जनसंपर्क महासंचालनालय जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिती कार्यालय जालना आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाटूर यांच्या संयुक्त विद्यामाने शासनाच्या विविध योजनांची लोककला आणि पथनाट्यांद्वारे जनजागृती अभिमानानाची सुरुवात सोमवारी तालुक्यातील हातडी या गावातून सुरू करण्यात आली. यावेळी लोककलेच्या माध्यामातून कोविड-१९ च्या काळात शासनाने काय उपाययोजना केल्या तसेच नागरिकांनी काय गोष्टी पाळावेत याचा लोककला व पथनाट्यच्या माध्यामातून जनजागृती करण्याचे काम चालू आहे. थोड्या काही दिवसांत तालुक्यातील विविध गावांत जनजागृती केली जाणार आहे. त्यात अंबा, श्रीष्टी, लिखीत, पिंपरी, दैठणा, चागतपुरी, रायगव्हाण या ठिकाणी होणार आहे. या आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाटूर संकलित आधार लोककला मंच सादर करणार आहे. यामध्ये शाहीर भास्कर साळवे, गणेश वाघमारे, गिरजा वाघमारे, गणेश घोडे, बापूसाहेब रंधवे, किशोर घोडे, शरद साळवे, हरीभाऊ गायके या कलाकारांचा समावेश असून हे जनजागृती करणार आहेत. आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे कलाकार हे गावागावांत जाऊन जनजागृती करणार आहे.

Web Title: Corona Awareness Pride begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.