शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
4
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
5
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
6
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
7
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
8
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
9
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
10
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
11
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
12
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
13
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
14
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
15
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
16
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
17
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
18
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
19
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
20
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवाने लाल फितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:34 IST

जालना पालिकेकडे आॅनलाईन घर बांधणीच्या परवानगीचे प्रस्ताव रखडल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेकडे आॅनलाईन घर बांधणीच्या परवानगीचे प्रस्ताव रखडल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही परवानगी लांबल्याने अनेकांची कर्ज प्रकरणे लांबणीवर पडली आहेत. तसेच वाळू आणि खडी टंचाईने बांधकाम क्षेत्र अडचणीत असताना परवानगीही मिळत नसल्याने नागरिक तिहेरी संकटात सापडले आहेत.जालना पालिकेने यापूर्वी अत्यंत चांगली कामगिरी करत महराष्ट्रात सर्वात जलदगतीने बांधकाम परवानगी दिल्या होत्या. एकेकाळी जालना पालिका महाराष्ट्रात क्रमांक एकवर होती. परंतु मध्यंतरी जालना पालिकेत जवळपास १२८ पेक्षा अधिक बांधकाम परवानगीची प्रकरणे या-ना त्या कारणाने प्रलंबित आहेत. याचा मोठा फटका येथील स्थापत्य अभियंत्यांना सहन करवा लागत असून, बांधकाम ठप्प असल्याने त्यांचा रोजगार हिरावला जात असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही. बांधकाम व्यवसायात दररोज किमान एक ते दीड हजार मजूर काम करतात, परंतु गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बांधकाम ठप्प झाल्याने मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. वाळूचे भाव गगनाला भिडले असून, स्टीलचे दरही वाढले आहेत. स्टोन क्रशर चालकांचा प्रश्नही निकाली निघत नसल्याने तो उद्योगही संकटात सापडला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.स्टोन क्रशर : प्रस्तावांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षजालन्यातील ८७ स्टोन क्रशर चालकांना विविध मुद्यांवर जिल्हा प्रशासनाने कोंडीत पकडले आहे. प्रत्यक्षात उत्खनन करताना ते विना परवाना केल्याचा स्टोन क्रशर चालकांवर ठपका ठेवला आहे. पंरतु त्यात तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. आम्हाला दगड खाणीतून उत्खनन करण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून, आम्ही २०१७ मध्ये प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवले होते.परंतु ते प्रस्ताव तसेच धूळ खात पडून आहेत. त्यातच आम्ही शासनाची रॉयल्टीही भरलेली आहे. मग आमची चूक ती काय, असा सवाल स्टोन क्रशर चालकांनी जिल्हाधिका-यां समवेत झालेल्या बैठकीत केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदonlineऑनलाइनHomeघर