अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:28 AM2019-07-22T00:28:38+5:302019-07-22T00:29:03+5:30

मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी गांधी यांना गैरमार्गाने अटक करून लोकशाहीचा गळा दाबल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

Congress demonstrations protested against the arrest | अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी या उत्तर प्रदेश येथील सोनभद्र येथे झालेल्या हात्याकांडातील कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी गांधी यांना गैरमार्गाने अटक करून लोकशाहीचा गळा दाबल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा सरकारच्या विरोधात जुना जालना भागातील गांधी चमन येथे रविवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.
भाजपा सरकारच्या विरोधात निदर्शने करीत प्रियंका गांधी ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भाजपा सरकारच्या धोरणांवर टिका केली.
यावेळी प्रदेश सचिव सत्संग मुंढे, गटनेते गणेश राऊत, राम सावंत, एकबाल कुरेशी, बदर चाऊस, राहुल देशमुख, विजय ज-हाड, गुरूमीतसिंग सेना, तालुकाध्यक्ष त्रिबंक पाबळे, निळकंठ वायाळ, वसंत जाधव, परमेश्वर गोते, विठ्ठलसिंग परदेशी, राजेश राठोड, सुष्मा पायगव्हाणे, राजेंद्र जैस्वाल, मंगल खांडेभराड, मथुराबाई सोळुके, रंगनाथ खेडेकर, नगरसेवक संजय भगत, वाजेद खान, आरेफ खान, सय्यद अजहर, संगीता पाजगे, अंजाभाऊ चव्हाण, भाऊसाहेब साळुंके, सोपान तिरूखे, खाजाभाई जमादार, विनोद गरदास, मोबीन खान, फकीरा वाघ, निलेश दळे, संजय जाधव, धुम्मेश निकम, जॉर्ज उगले, प्रकाश नारायणकर, संतोष देवडे, रईस जमादार, गणेश भालेराव, सुरेश वाहुळे, धर्मा खिल्लारे, महशे दसपुते, रफिक कादरी, अरूण घडलिंग, हरीश आनंद यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाचे लोकशाही विरोधी मनसुबे हाणून पाडू
यापुढे भाजपा सरकारने लोकशाही विरूद्ध पावले उचलली तर देशपातळीवर त्याचा जोरदारपणे मुकाबला करून त्यांचे वाईट मनसुबे हानून पाडू, असे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले.
तसेच माजी जिल्हाध्यक्ष आर.आर. खडके, भीमराव डोंगरे, कल्याण दळे, विजय कामड, राजेंद्र राख, शेख महेमूद यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकशाही विरोधी कृत्यावर टीकेची झोड उठवीत यापुढील काळातही लोकशाही विरोधी मनसुबे काँग्रेस पक्ष हानून पाडेल, असा इशारा दिला.

Web Title: Congress demonstrations protested against the arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.