परतूर येथे शिक्षण परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:07 AM2019-08-02T01:07:35+5:302019-08-02T01:08:10+5:30

परतूर शहरातील जि. प. शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत बुधवारी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Conducting education conference at Pratur | परतूर येथे शिक्षण परिषदेचे आयोजन

परतूर येथे शिक्षण परिषदेचे आयोजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : परतूर शहरातील जि. प. शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत बुधवारी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक आर. के. खतीब हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी संतोष साबळे, गटसमन्वयक कल्याण बागल, केंद्रप्रमुख बाबासाहेब तरवटे यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करून, विद्यार्थी शंभर टक्के कसे प्रगत होतील यावर भर देणे गरजेचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक प्रभाकर नळगे, विष्णू ढवळे, सरफराज कायमखानी, रंगनाथ रोकडे, अंजली कोळकर, स्मिता रोडगे, ज्योती गाडेकर, राजेश कानपुडे, रामा माने, राम भोसले, नितीन भोसलेंसह शिक्षकांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ज्योती गाडेकर, रंगनाथ रोकडे, राजेश कानपुडे यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Conducting education conference at Pratur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.