शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

लेकरा परत ये रे...विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीत गेला अन् मृतदेहच दारात आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:25 IST

दिंडीत हरवलेल्या मुलाचा मृतदेहच समोर आल्याने आईने एकच हंबरडा फोडला.

अंबड (जि. जालना) : विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीसोबत पंढरीकडे गेलेल्या गोविंदचा मृतदेहच बुधवारी मध्यरात्री झिरपी येथील घरी आणण्यात आला. दिंडीत हरवलेल्या मुलाचा मृतदेहच समोर आल्याने आईने एकच हंबरडा फोडला. लेकरा परत ये रे... अशी आर्त साद घालणाऱ्या आईचा हंबरडा ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

गोविंद ऊर्फ आकाश कल्याण फोके (वय १९, रा. झिरपी, ता. अंबड) असे मयताचे नाव आहे. घुंगर्डे हदगाव येथील हभप विष्णू महाराज मस्के यांच्या दिंडीत १८ जूनपासून गोविंद फोके हा त्याची आजी प्रयागबाई खराबे यांच्यासोबत गेला होता. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडीमधील १२ नंबरची ती दिंडी होती. गोविंद यंदा प्रथमच दिंडीत सहभागी झाला होता. परंतु, १ जुलै रोजी सकाळी माळशिरस तालुक्यातील सराटी गावाजवळील नीरा नदीत आंघोळीसाठी उतरल्यानंतर गोविंद नदीपात्रात बुडाला होता. घटनेच्या ३६ तासांनंतर बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदनानंतर बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास गोविंदचा मृतदेह गावात आणण्यात आला. त्या वेळी आई-वडिलांसह नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. मुलाचा मृत्यू झाला, यावर त्या आईचा विश्वास बसत नव्हता. शोकाकुल वातावरणात गोविंदच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आई-वडील आजारीमुलगा दिंडीत हरवल्याची माहिती मिळाल्यानंतर गोविंदच्या आईची प्रकृती खालावली होती. दोन वेळेस त्यांना डॉक्टरांकडे न्यावे लागले. वडिलांचीही प्रकृती बुधवारपासून खालावली होती. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने फोके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

संपूर्ण गाव जागलंगोविंदचा मृतदेह सापडल्याची माहिती झिरपी गावात मिळाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. मध्यरात्रीच अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती गावकऱ्यांना होती. त्यामुळे मृतदेह गावात येणे आणि अंत्यसंस्कार होईपर्यंत गावातील सर्वच मंडळी जागी होती.

...अन् मनात पाल चुकचुकलीगोविंद बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे, अशीच माहिती त्याच्या आईला देण्यात आली होती. परंतु, बुधवारी रात्री घराकडे येणाऱ्या नातेवाइकांचा ओढा वाढल्याने आईच्या मनात पाल चुकचुकली. माझ्या लेकराला काय झालं असेल? असं त्या विचारत होत्या.

कुटुंबाला मदत द्या : नारायण कुचेनीरा नदीपात्रात बुडून मयत झालेल्या गोविंद फोके याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार नारायण कुचे यांनी विधिमंडळात केली आहे.

टॅग्स :Jalanaजालनाashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025