टेम्पो सोडविण्यासाठी वाळू माफियांची तलाठ्यांशी हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:51 IST2018-12-02T00:51:29+5:302018-12-02T00:51:51+5:30
पकडलेले टेम्पो सोडून देण्यासाठी वाळू माफियांनी चक्क तलाठ्यांसोबत दोन तास हुज्जत घातली.

टेम्पो सोडविण्यासाठी वाळू माफियांची तलाठ्यांशी हुज्जत
तळणी : पूर्णा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची चोरी करून वाहतूक करणारे दोन टेम्पो शुक्रवारी रात्री १० वाजता गेवराई ते विडोळी दरम्यान पकडण्यात आले आहेत. ही कारवाई महसूल व पोलीस पथकाने केली आहे. मात्र, पकडलेले टेम्पो सोडून देण्यासाठी वाळू माफियांनी चक्क तलाठ्यांसोबत दोन तास हुज्जत घातली.
पूर्णा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी वाळूची चोरी सुरू असल्याच्या माहितीवरून महसूलचे पथक कारवाईसाठी गेले असता त्यांना वाळू उपसा करणारे दोन विनाक्रमांक टेम्पो आढळून आले. मात्र, यानंतर वाहनांवर कोणतीच कारवाई करू नये, यासाठी वाळू माफियांनी तलाठी नितीन चिंचोळे यांच्याशी दोन तास हुज्जत घातली. पोलिसांच्या मदतीने टेम्पो कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.