सातोना मंडळात ढगफुटी; १७३ मिमी पावसाची नोंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:27 AM2019-10-21T00:27:21+5:302019-10-21T00:27:39+5:30

परतूर तालुक्यातील सातोना महसूल मंडळात शनिवारी अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस झाला

Clouds over Saturn's circle; 3mm rainfall ... | सातोना मंडळात ढगफुटी; १७३ मिमी पावसाची नोंद...

सातोना मंडळात ढगफुटी; १७३ मिमी पावसाची नोंद...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / परतूर : परतूर तालुक्यातील सातोना महसूल मंडळात शनिवारी अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस झाला. रविवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात या मंडळात तब्बल १७३ मिमी पाऊस झाला. तर सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
चालू वर्षात प्रथमच मागील २४ तासांत जालना जिल्ह्यात ४२.५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची मंडळनिहाय आकडेवारी पाहता जालना ५३ मिमी, ग्रामीण १९ मिमी, रामनगर १७ मिमी, विरेगाव ३५ मिमी, नेर ११ मिमी, सेवली २९ मिमी, पाचनवडगाव ४२ मिमी, वाघ्रूळ जहागीर ६५ मिमी पाऊस झाला. बदनापूर तालुक्यात बदनापूर ४६ मिमी, रोषणगाव ४३ मिमी, दाभाडी ११५ मिमी, सेलगाव ४५ मिमी, बावणे पांगरी ५० मिमी पाऊस झाला. भोकरदन ३३ मिमी, सिपोरा बाजार २७ मिमी, धावडा ३९ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ४५ मिमी, हसनाबाद १२० मिमी, राजूर ५२ मिमी, केदारखेडा ३८ मिमी तर अनवा महसूल मंडळात ४५ मिमी पाऊस झाला. जाफराबाद २१ मिमी, टेंभुर्णी २८ मिमी, कुंभारझरी १९ मिमी, वरूड २० मिमी, माहोरा १९ मिमी पाऊस झाला. परतूर ८० मिमी, सातोना १७३ मिमी, आष्टी ३२ मिमी, श्रीष्टी ७८ मिमी, वाटूर महसूल मंडळात ५७ मिमी पाऊस झाला. मंठा तालुक्यात मंठा ५२ मिमी, ढोकसाल ४४ मिमी, तळणी ४ मिमी, पांगरी गोसावी ३१ मिमी पाऊस झाला. अंबड ३५ मिमी, धनगरपिंपरी २५ मिमी, जामखेड ३५ मिमी, वडीगोद्री ४१ मिमी, गोंदी १६ मिमी, रोहिलागड ३७ मिमी, सुखापुरी ९ मिमी पाऊस झाला. घनसावंगी ५६ मिमी, राणी उंचेगाव १६ मिमी, रांजणी ४० मिमी, तीर्थपुरी १५ मिमी, कुंभार पिंपळगाव ३५ मिमी, अंतरवली टेंम्बी ३१ मिमी तर जांभ समर्थ महसूल मंडळात १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
परतूर तालुक्यासह सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी
परतूर: परतूर तालुक्यात रविवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात सरासरी ८४.१० मिमी पाऊस झाला आहे. यात परतूर महसूल मंडळात ८० मिमी, सातोना १७३ मिमी, श्रीष्टी ७८ मिमी, वाटूर ५७ मिमी, तर आष्टी सर्कल मध्ये सर्वात कमी ३२ मिमी पावसाची नोंद झाली. आजवर तालुक्यात सरासरी ६०५. ५ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जालना तालुक्यात ३३.३८ मिमी, बदनापूर ५९.८० मिमी, भोकरदन ४९.८८ मिमी, जाफराबाद २१.४० मिमी, परतूर ८४.१० मिमी, मंठा ३२.७५ मिमी, अंबड २८.२९ मिमी तर घनसावंगी तालुक्यात ३०.२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Clouds over Saturn's circle; 3mm rainfall ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.