शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

३० हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:24 AM

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील ७३ केंद्रावर ही परीक्षा होणार असून, ३० हजार ८१४ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहे.परीक्षा केंद्रांवर सुविधा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ३० हजार विद्यार्थी ७३ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्तीसाठी ६ भरारी पथके नेमण्यात आली असून,१० केंद्र परिरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, रोडरोमिओंचा त्रास टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचे माहिती शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. परीक्षेस जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.आठवीचे ३७४ तर पाचवीचे ४५५ विद्यार्थी अनुपस्थितलोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षण विभागाच्यावतीने रविवारी आठवी व पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. आठवीच्या ८३५२ पैकी ७९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ३७४ विद्यार्थी अनुपस्थित होते. पाचवीच्या १०७८६ पैकी १०३३१ विद्यार्थ्यांची परीक्षेस उपस्थिती होती. ४५५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.राज्य शासनाच्या वतीने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. १०० केंद्रावर पाचवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. पेपर -१ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत घेण्यात आला. पेपर एकला १०७८६ पैकी १०३३१ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर ४५५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पेपर २ ला १०७८६ पैकी १०३१६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर ४७० विद्यार्थी अनुपस्थित राहिले.७३ केंद्रावर आठवीची परीक्षा घेण्यात आली. पेपर १ ला ८३५२ पैकी ७९७८ विद्यार्थी उपस्थित होते. तर ३७४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पेपर २ ला ८३५२ पैकी ७९७६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ३७६ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती. सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. यासाठी शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी खरात यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. परीक्षा केंद्राबाहेर पालकांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी