शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

‘जय महावीर’च्या जयघोषाने दुमदुमले जालना शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 1:00 AM

जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना शहरात भगवान महावीर जन्मकल्याणकाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना शहरात भगवान महावीर जन्मकल्याणकाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. प. पू. दिलीपकंवरजी म. सा; प. पू. सौम्यप्रज्ञाश्रीजी म. सा. यांच्या सान्निध्यात सकल जैन समाजाच्या वतीने मोठी शोभा यात्रा काढण्यात आली.भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून सकाळी महावीर चौक येथे सकल जैन संघाच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर शोभा यात्रेस प्रारंभ झाला.सकल जैन समाज एकत्र आल्याने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शोभा काढण्यात आली. अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात निघालेली ही शोभा यात्रा शहरातील विविध मार्गाने जाऊन यांची सांगता शिवाजी पुतळ्याशेजारी असलेल्या गुरु गणेशनगर मध्ये झाली. बॅण्ड पथक हे या शोभा यात्रेचे खास आकर्षण होते. समाज बांधवांच्या वतीने शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर सकल जैन समाजाच्या वतीने जालना शहरवासियांसाठी प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले.शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी संजय लव्हाडे, डॉ. गौतमचंद रुणवाल, संजय मुथा, सुदेश सकलेचा, विजयराज सुराणा, विजयकुमार सकलेचा, धर्मेंद्र धोका, वीरेंद्र धोका, श्री ललवाणी, विनयकुमार आबड, उत्तमचंद बनवट, अशोक बिनायकिया, सुरेशचंद मुथा, मनोज मोदी, प्रमोद देसरडा, गौतमचंद मुनोत, विजय जैन, प्रेमचंद कासलीवाल, प्रवीण पहाडे, शिखर लोहाडे, रजत चोविश्या, विनोद पाटणी, संतोष बडजाते, जैनराज सेठीया, पवन सेठिया, माणिकचंद कासलीवाल, सुरेश मरलेचा, महावीर रुणवाल, सोमेश ठोले, योगेश पाटणी, अनिल छाबडा, सुधीर पहाडे, विजय सावजी, कन्हैया पाटणी, हसमुख शाह, प्रदीप सियाल, प्रकाश सुराणा, दीपक मिश्रीकोटकर, अनुप डोणगावकर, प्रकाश नेवे, सुरेश अग्रवाल, विजय सावजी, निलेश लव्हाडे यांनी परिश्रम घेतले.जिल्हा न्यायालयात महावीर जयंतीजालना : व्यक्ती आणि परिस्थिती बदलता येत नाही. मात्र आपण स्वत: निश्चितच बदलू शकतो आणि हा बदल घडवण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. व्यवहार आणि अध्यात्म या दोन वेगवेगळ्या बाबी असल्या तरी त्यांची सांगड घालता आली पाहिजे, असे प्रतिपादन प्रथम सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी येथे बोलतांना केले.जैन समाजाचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना जिल्हा वकील संघाच्यावतीने प्रथमच जिल्हा न्यायालयात भगवान महावीरांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना न्या. टेकाळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश वेदपाठक, मिश्रा, पोतदार, कोन्होळे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. विपुल देशपांडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, अ‍ॅड. दिनेश भोजने, अ‍ॅड. भुषण तवरावाला, अ‍ॅड. अनुज लकडे, अ‍ॅड. सोपान शेजूळ, जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष सुदेश सकेलचा, इंद्रकुमार गादीया आदींची उपस्थिती होती....तरच महावीर जयंती साजरी केल्याचं सार्थक-अरुणप्रभाजी म.सा.जालना : भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जालनेकरांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला असला तरी, नुसत्या घोषणा देऊन काहीही होत नसते. भगवान महावीरांनी सांगितलेले तत्त्व जोपर्यंत तुम्ही अंगिकारत नाही, तुमच्या मनात उतरवत नाहीत, तोपर्यंत महावीरांची जयंती साजरी करण्याला कोणताही अर्थ प्राप्त होत नाही. भगवान महावीरांचे तत्व अंगिकारले तरच महावीर जयंती साजरी केल्याचं सार्थक होईल, असा हितोपदेश प. पू. अरुणप्रभाजी म. सा. यांनी येथे बोलताना दिला.जैन समाजाचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी येथील तपोधाममधील गुरुगणेश भगवानमध्ये आयोजित विशेष प्रवचनात प. पू. अरुणप्रभाजी म. सा. बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर प. पू. दिलीपकुंवरजी म. सा; प. पू. सौम्यप्रभाजी म. सा. प. पू. गुलाबकवंरजी म. सा. आदींची उपस्थिती होती. प्रारंभी गुलाबकंवरजी म. सा. यांनी भगवान महावीरांच्या चरित्राबद्दल थोडक्यात माहिती दिली. पुढे बोलताना प. पू. अरुणप्रभाजी म्हणाल्या की, खरे तर आम्ही खरोखरच भाग्यशाली आहोत की आम्हाला अहिंसेचा आणि जियो और जिने दो असा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती साजरी करण्याची संधी मिळाली आहे. परंतु भगवान महावीरांबद्दल आपल्याला किती आस्था आहे?

टॅग्स :Mahavir Jayantiमहावीर जयंतीcommunityसमाजReligious programmeधार्मिक कार्यक्रम