लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न; रुग्णालयांतील ओपीडी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:27+5:302021-08-20T04:34:27+5:30
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु, लहान मुलांना ताप, खोकला, सर्दी यांसह इतर विविध आजार जडू लागले आहेत. ...

लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न; रुग्णालयांतील ओपीडी वाढली
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु, लहान मुलांना ताप, खोकला, सर्दी यांसह इतर विविध आजार जडू लागले आहेत. हे आजार कोरोनाची लक्षणे असल्याने पालकांची धास्ती वाढली आहे. अनेक नागरिक मुलांना खासगी डॉक्टरांकडे नेऊन उपचार घेत आहेत, तर शासकीय रुग्णालयातील बालरोग विभागात येणाऱ्या बाल रुग्णांची संख्याही मोठी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांना तपीसह इतर आजार जडू लागले आहेत. खासगी रुग्णालयांसह जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील ओपीडीतही दुप्पटीने वाढ झाली आहे.
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु, लहान मुलांना ताप, खोकला, सर्दी यासह इतर विविध आजार जडू लागले आहेत. हे आजार कोरोनाची लक्षणे असल्याने पालकांची धास्ती वाढली आहे. अनेक नागरिक मुलांना खासगी डॉक्टरांकडे नेऊन उपचार घेत आहेत, तर शासकीय रुग्णालयातील बालरोग विभागात येणाऱ्या बालरुग्णांची संख्याही मोठी वाढली आहे.
५० टक्के मुलांची कोरोना चाचणी
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या बालरुग्णांना अधिकची ताप आणि खोकला असेल तर त्यांची कोरोना तपासणी होते.
काळजीपोटी कोरोनाची तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. हे प्रमाण सरासरी ५० टक्क्यांहून अधिक आहे.
डेंग्यू-मलेरियाची चाचणी
सध्या शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत डेंग्यूसदृश आजारासह मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. यातील बहुतांश रुग्णांची तपासणी केली जात आहे. आजारानुसार घ्यावयाचे औषधी आणि दक्षता याबाबत तज्ज्ञ डॉक्टर पालकांना मार्गदर्शन करीत आहेत. डेंग्यू-मलेरियाची चाचणी सध्या शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत डेंग्यूसदृश आजारासह मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. यातील बहुतांश रुग्णांची तपासणी केली जात आहे. आजारानुसार घ्यावयाचे औषधी आणि दक्षता याबाबत तज्ज्ञ डॉक्टर पालकांना मार्गदर्शन करीत आहेत.
बालरोग तज्ज्ञ म्हणतात....
वातावरणातील बदलांमुळे बालरुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ताप, सर्दी खोकला आदी विविध आजार मुलांना होत आहेत. मुलांचा या आजारापासून बचाव करण्यासाठी पालकांनी अधिकची काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. संजय जगताप,
बालरोग तज्ज्ञ
गत काही दिवसांमध्ये बाल रुग्णांच्या ओपीडीत वाढ झाली आहे. तापीचे रुग्ण वाढले आहेत. वातावरणातील बदलांचा हा परिणाम आहे. पालकांनी घाबरून न जाता आणि घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.
- पीयुश होलानी, बालरोगतज्ज्ञ
ही घ्या काळजी
पावसाळ्यात पाणी शक्यतो उकळून, निर्जंतुकीकरण करून प्यावे.
पालकांनी लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी फिरण्यास नेऊ नये.
बाहेरील, उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ खाणे टाळावे.