दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 01:12 AM2019-02-18T01:12:13+5:302019-02-18T01:12:57+5:30

टोकियो येथे होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत मी निश्चितपणे देशाला सुवर्णपदक मिळवून देईल असा आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय अंध जलतरणपटू कांचनमाला पांडे हिने व्यक्त केला.

Change the attitude of looking at handicapped | दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला

दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला

googlenewsNext

राजेंद्र घुले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दिव्यांगांना केवळ दया दाखवून चालणार नाही, तर त्यांच्याकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, अपंग असतानाही आपण मोठ्या हिंमतने आणि वडिलांच्या भक्कम पाठिब्यामुळे आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत देशाला ११ सुवर्ण आणि राष्ट्रीय पातळीवर १२४ सुवर्णपदक मिळवू शकले. आता टोकियो येथे होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत मी निश्चितपणे देशाला सुवर्णपदक मिळवून देईल असा आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय अंध जलतरणपटू कांचनमाला पांडे हिने रविवारी मैत्र मांदियाळीतर्फे अयोजित प्रकट मुलाखती दरम्यान व्यक्त केला.
मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान आणि समर्पण सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तरूणाईच्या वाटा या कार्यक्रमाचे आयोजन फुलंब्रीकर नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी कांचनमाला पांडे यांची मुलाखत मनोज गोविंंदवार यांनी घेतली. या मुलाखती दरम्यान गोविंदवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना कांचनमाला पांडे हिने आत्मविश्वासने उत्तरे दिली. यावेळी १८ वर्षाची असताना एका जलतरण स्पर्धेत अपयश आल्याने खचून जाऊन आत्महत्येचा विचार मनात आला होता. असे सांगून आई-वडिलांनी मुलांवर आपल्या अपेक्षा न लादण्याचे आवाहन केले.
डोळसांच्या स्पर्धेत आपण एक अंध स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवून सुवर्णपदकापर्यंत मजल मारली. यासाठी जिद्द आणि परिश्रम घेतल्यानेच हे शक्य झाल्याचे कांचनमाला पांडे हिने सांगितले. प्रास्ताविक अनिता कुलकर्णी यांनी केले.
यावेळी मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे, अनिल कुलकर्णी, निवृत्ती रूद्राक्ष, राजीव पाटील, संदीप मोहरीर, कावेरी शेळके, स्वाती कुलकर्णी, जानकी रूद्राक्ष, रूपाली मोहरीर, रोहिणी सकट, वर्षा पाटील, वर्षा खंडागळे आदींची उपस्थिती होती.



प्रसिद्ध साहित्यिक रेखा बैजल यांचीही यावेळी प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी आपणास गायिका व्हायचे होते, मात्र आपण लेखिका झाले. आंतररजातीय विवाहानंतर आपण संसारात रममाण झालो. त्यामुळे गाण्याची आवड दूर ठेवून, लेखन करत गेले, आणि त्यातून कविता तसेच ललित, कादंबरी साहित्य निर्माण होत गेले. लेखनाला घराणे नसते, लेखन हे आपल्या अभिव्यक्तीतून प्रगट होते. आज समाजात
आंतरजातीय विवाह होत असले तरी ते टिकत नसल्याचे चित्र दिसत आहे

यावेळी चिखली येथील सेवा संकल्पच्या माध्यमातून मनोरूग्णांसाठी कार्य करणाºया आरती पालवे यांचीही यावेळी प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या की, सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही मनोरूग्णांना आधार देण्याचे कार्य करत आहोत, पशुवत जगत असलेल्या मनोरूग्णांना समाजाने आधार देण्याची गरज आहे. तसेच या मनोरूग्णांच्या पुनर्वसनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेत मनोरूग्णांची सेवा करताना अंगावर शहारे आणणारे अनुभवही त्यांनी यावेळी विशद केले.

Web Title: Change the attitude of looking at handicapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.