धूम स्टाईल मंगळसूत्र चोरणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:38 IST2018-09-07T00:38:04+5:302018-09-07T00:38:35+5:30

भरधाव दुचाकीवरून येवून धूम स्टाईलने मंगळसूत्र लांबविणाऱ्या तीन चोरट्यांपैकी दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुरूवारी या दोन आरोपींकडून ४३ हजार रूपयांचे दागिने जप्त केले आहेत.

Chain snatchers arrested | धूम स्टाईल मंगळसूत्र चोरणारे जेरबंद

धूम स्टाईल मंगळसूत्र चोरणारे जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भरधाव दुचाकीवरून येवून धूम स्टाईलने मंगळसूत्र लांबविणाऱ्या तीन चोरट्यांपैकी दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुरूवारी या दोन आरोपींकडून ४३ हजार रूपयांचे दागिने जप्त केले आहेत.
जुना जालना भागातील अण्णा भाऊ साठे पुतळा ते मुक्तेश्वर द्वार या दरम्यान सकाळी मोठ्या प्रमाणावर महिला पायी फिरण्यासाठी जातात याचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईलने लांबविले, तर दुर्गामाता मंदिरातूनही एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावून स्वप्नील उर्फ नील सुनील शहा (रा.क्रांतीनगर), नीलेश विजय काकडे (रा.नवीन जालना) यांना ताब्यात घेऊन यांची कसून चौकशी केली असता या दोनही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तिघांनी मिळून लांबविल्याचे कबूल केले. गुरूवारी या दोघांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चैतन्य एस., अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक जयसिंह परदेशी तसेच कर्मचारी हरिश राठोड, कैलास कुमावत, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, लखन पचलोरे, किशोर जाधव, परमेश्वर धुमाळ, विलास चेके, राहुल काकरवाल, रवी जाधव यांनी पार पाडली.

Web Title: Chain snatchers arrested