शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:18 AM

राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती शनिवारी जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती शनिवारी जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.राजुरेश्वर विद्यालय आमलगावमठपिंपळगाव : अंबड तालुक्यातील आलमगाव येथील राजुरेश्वर विद्यालयामध्ये मॉ. जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी मुख्याध्यापक केजभट, रामेश्वर बागल, जीवन झिंजुर्डे, मंगेश फटाले, पुंडलिक पाटील, जगताप माऊली, सोमनाथ वाघुंडे, संतोष भिसे, व्यंकटेश शेळके, किशोर पडघन, सतीश वाघमारे, देशमुख आदींची उपस्थिती होती.जि. प. प्रा. शाळा खांबेवाडीजालना : तालुक्यातील खांबेवाडी जि. प. प्रा. शाळेत मुख्याध्यापक व्ही. एल. बिरादार यांनी राजमाता जिजाऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन केले. यानंतर उपस्थितांना बिरादार यांनी जिजाऊंच्या व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. दरम्यान शाळेतील दिक्षा चव्हाण हिने राजमाता जिजाऊंची वेशभुषा करून उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले होते. यावेळी शा. व्य. स. अध्यक्ष जिजाबाई राठोड, निवृत्ती शिंदे, गजानन चव्हाण, राजू चव्हाण, कृष्णा चव्हाण, गजानन मगर, संतोष मगर, सुधाकर राठोड, पंढरीनाथ क्षिरसागर, प्रकाश राऊत आदींची उपस्थिती होती.कै. नानासाहेब पाटील विद्यालयचंदनझिरा : येथील कै. नानासाहेब पाटील विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊसाहेब जयंतीनिमित्त महास्वच्छता फेरी काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन सतीश जाधव व नगरसेविका मालन दाभाडे, संतोष शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक रामदास जावळे, शांतीलाल राऊत, सिराज पटेल, सुदर्शन वाघ, सचिन भोंगाने, ज्ञानेश्वर मिसाळ आदींची उपस्थिती होती.श्री शिवाजीराव शेंडगे विद्यालयचंदनझिरा : येथील श्री. शिवाजीराव शेंडगे विद्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक बी. एस. आबुज, नगरसेविका स्वाती जाधव, नगरसेविका लक्ष्मी लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान महास्वच्छता रॅली काढण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना सामुदायिक स्वच्छतेची शपथ घेतली.जनता विद्यालयपारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता विद्यालयात राजमाता जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राजमाता जिजाऊ भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी प्राचार्य व्ही. जी. देशमुख, महेंद्र लोखंडे, विजयामाला इंगळे, राजेंद्र देशमुख, प्रा. एस. डी. हिवाळे, प्रा. एस. एन. पायघन, प्रा. संग्राम देशमुख, मृदुला पवार, आर. के. वानखेडे आदींची उपस्थिती होती.छत्रपती शिवाजी महाविद्यालयभोकरदन : तालुक्यातील तांदुळवाडी येथील छत्रपती श्री. शिवाजी महाविद्यालयात प्रा. डी. आर. आर. पिसे यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी एच. व्ही. नागरगोजे, पिसे, प्रा. आर. एस. मिसाळ आदींची उपस्थिती होती.संभाजी ब्रिगेड हालदोलाबदनापूर : तालुक्यातील हालदोला येथे संभाजी ब्रिगेडतर्फे देवीदास मात्रे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन केले. यावेळी सरपंच तात्यासाहेब मात्रे, भाऊसाहेब मात्रे, प्रा. नरेश मात्रे, गिरधारी मात्रे, परमेश्वर मात्रे, देवकर्ण शेळके, भानुदास मात्रे, नामदेव मात्रे, प्रदीप शिंदे, परशुराम जोशी, नारायण बुरकूल, केशव मात्रे, बालाजी मात्रे, प्रल्हाद जोशी, निवास शेळके, प्रल्हाद मात्रे, सोपान बोरुडे, मनोज जोशी, योगेश मात्रे, यश मात्रे आदींची उपस्थिती होती.विवेकानंद इंग्रजी शाळारांजणी : येथील विवेकानंद इंग्रजी शाळेतील आयोजित कार्यक्रमात एस. के. मोठे, एस. एन. उफाड, बी. ए. हरबक, एम. यू. मुके, जी. एम. जाधव, बी. एन. मरसाळे, एन. बी. पवार, सुमनबाई काळे आदींची उपस्थिती होती.आन्वा ग्रामपंचायतआन्वा : येथील ग्रामपंचायतमधिल आयोजित कार्यक्रमात सरपंच मदन कुलवाल, उपसरपंच अमरजित देशमुख, माजी सरपंच मंजित पांडव, केशव काळे, बंडू भाले, कैलास हजारी, ग्रामविकास अधिकारी महेंद्र साबळे, साहेबराव पाटील यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.लाल बाहदूर शास्त्री विद्यालयपरतूर : शहरातील लाल बाहदूर शास्त्री विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डी. बी. खिल्लारे, उपमुख्याध्यापक एस. के. वायाळ, जी. डी. शिंदे, टी. जी. घुगे, आसाराम धुमाळ, माणीकराव काळे, सुनील जाधव आदींची उपस्थिती होती.जि. प. शाळा माहेरजवळापारडगाव : घनसावंगी तालुक्यातील माहेरजवळा येथील जिल्हा परिषद शाळेतील आयोजित कार्यक्रमात जगन आरवे, संतोष राठोड, पाटोळे, विलास पवार, ओमप्रकाश हुलगडे, कुलदिके, खरात आदींची उपस्थिती होती.अंगणवाडी पारडगावपारडगाव : येथील अंगणवाडीमध्ये यमुनाबाई ढवळे, गाजरे, ढेरे, वैष्णवी विभुते, सुतार, अर्जुन खरात यांनी राजमाता जिजाऊसाहोब यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन केले.मोरया इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलदानापूर : मोरया इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्य बी. के. जाधव यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. साधना दळवी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांमधून अनास सय्यद, फरहान शेख यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी राजू आगलावे, संजय सिरसाठ, साहेबराव जंजाळ, संजय मालोदे, मोबीन शेख, दिलीप वैद्य, राजू सिरसाठ, अज्जू शेख आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी जाई बावस्कर, सिमा पठाण, मंगलाबाई दळवी यांनी प्रयत्न केले. जयश्री दांडगे यांनी आभार मानले.शिवाजी विद्यालय भोकरदनभोकरदन : येथील श्री. गणपती इंग्लिश हायस्कूल, श्री गणपती मराठी विद्यालय, पायोनियर सीबीएसई स्कूल व स्व. भाऊसाहेब देशमुख मराठी विद्यालय जोमळा येथे जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान चौथीतील विद्यार्थिनी साक्षी सपकाळ हिने जिजामाता यांच्यावर गीत सादर केले. इयत्ता तिसरीची तेजस्विनी लोखंडे हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नगराध्यक्षा मंजुषा देशमुख, खोमणे, नगरसेविका वंदना तळेकर, रमेश जाधव, दादाराव देशमुख, आनंदा तुपे, मुख्याध्यापक पी. बी. रोजेकर, जी. व्ही जाधव, सोपान सपकाळ आदींची उपस्थिती होती.शिवाजी विद्यालयदाभाडी : येथील शिवाजी विद्यालयात आयोजित कार्यक्रमात सरपंच मुकूंद जैवाळ, जी. बी. भेरे, नंदकुमार जैवाळ, बी. जी. डोळस, के. पी. रगडे, एन. एन. सोनटक्के, पंकज निकम आदींची उपस्थिती होती.जि. प. कन्या शाळादाभाडी : स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हा परिषद कन्या व केंद्रिय प्राथमिक शाळेतर्फे गावात प्रभात फेरी, लेझीम संचलन व मैदानी खेळ आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी सरपंच मुकूंद जैवळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान मुकूंद जैवळ यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी मुख्याध्यापक खरात, पं. स. सदस्य केदारनाथ टेकाळे, शा. व्य. समिती अध्यक्ष पंढरीनाथ बकाल, सोमनाथ पवार, सुभाष गोलेछा, गणेश भेरे, कृष्णा निकम, रमेश सोरमारे, भगवान गाढे, जनार्धन बकाल आदींची उपस्थिती होती.अंगणवाडी केंद्र रांजणीरांजणी : येथील अंगणवाडी केंद्रातील आयोजित कार्यक्रमात वंदना पावटेकर, प्रिया वडगावकर, रजनी देशपांडे, छाया हलगे, इरफाना आतार, मंजुषा केटे, लता वरखडे, मंगल पवार, द्वारका बरवे, अनुसया शिंदे आदींची उपस्थिती होती.मराठा सेवा संघ व शिवगर्जना युवा प्रतिष्ठानजाफराबाद : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा सेवा संघ व शिवगर्जना युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमचे पुजन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष दीपक पाटील, डॉ. साहेबराव भोपळे, अ‍ॅड. विकास जाधव, देवकर, प्रभू गाढे, विशाल वाकडे, समाधान सरोदे, चेतन बायस, प्रदीप भोपळे, राजू ब-हाटे, पिंटू वाकडे, सचिन वाकडे, ज्ञानेश्वर जाधव, अभिषेक खंडेलवाल, कृष्णा झगरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवSocialसामाजिकSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद